मुंबई

उन्हाळा वाढतोय, आरोग्य सांभाळा

CD

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ४ : दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. दिवसभरात ३७ अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमानाची नोंद होत आहे. आगामी काळात हा उकाडा अगदी ४० अंशाच्याही पुढे जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मानवी आरोग्याला उष्माघातासारख्या त्रासापासून वाचण्यासाठी डॉक्टरांनी पाणी, औषधे व कोणते कपडे परिधान करावे, याबाबत सूचना केल्या आहेत.
उष्‍माघात हा उष्‍णतेशी संबंधित सर्वांत चिंताजनक आजार आहे. शरीर तापमानावर नियंत्रण ठेवण्‍यास अक्षम होते तेव्‍हा हा आजार होतो. बहुतेक वेळा त्‍यांचे प्रतिकूल परिणाम दिसून येतात. उष्‍माघातामध्‍ये शरीराची स्‍वेटिंग सिस्‍टम (घाम येण्‍याची यंत्रणा) निकामी होते, ज्‍यामुळे शरीराला थंडावा मिळण्‍यामध्‍ये अडथळा येतो. उष्‍माघातादरम्‍यान १० ते १५ मिनिटांमध्‍ये शरीराचे तापमान १०६ अंश फॅरेड किंवा त्‍यापेक्षा अधिक होऊ शकते. अधिक काळापर्यंत उच्‍च तापमानात राहणाऱ्या किंवा उष्‍ण वातावरणात अधिक प्रमाणात शारीरिक व्‍यायाम करणाऱ्या व्‍यक्‍तींना उष्‍माघात होण्‍याची शक्‍यता असते. त्‍वरित वैद्यकीय हस्‍तक्षेप न केल्‍यास उष्‍माघातामुळे आरोग्‍यविषयक गुंतागुंती, कायमस्वरूपी अपंगत्‍व येण्‍यासोबत मृत्‍यूदेखील होऊ शकतो. उष्माघाताचा संशय असल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे आहे. या ऋतूमध्ये तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने उष्माघाताचा धोका वाढत आहे. गरम हवामानात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, जसे हायड्रेटेड राहणे, हलके व सैल सुती कपडे घालणे, गर्दीच्या वेळेस बाहेर जाणे टाळणे आणि शक्‍य असल्‍यास सावली किंवा वातानुकूलनाचा आसरा घेणे गरजेचे आहे.

उष्‍माघात दोन प्रकारचे आहेत
एक्‍झर्शनल : या प्रकाराचा शारीरिकदृष्‍ट्या तंदुरुस्‍त व्‍यक्‍तींसह अधिक प्रमाणात शारीरिक क्रियाकलापांमध्‍ये समाविष्‍ट असलेले अॅथलीट्स, कामगार यांच्‍यावर परिणाम होऊ शकतो.
नॉन एक्‍झर्शनल : या प्रकाराचा वृद्ध व्‍यक्‍ती, तसेच लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार, स्मृतिभ्रंश आणि अल्‍कोहोलिझम अशा आरोग्‍यविषयक आजारांनी पीडित व्‍यक्‍तींना हलक्‍या स्वरूपात शारीरिक व्‍यायाम करतानादेखील त्रास होऊ शकतो.

---------
लक्षणे
- उष्‍ण, कोरडी त्‍वचा किंवा घाम न येणे
- शरीराचे असामान्‍य उच्‍च तापमान
- गोंधळून जाणे, अस्पष्ट बोलणे
- चेतना नष्‍ट होणे
- सीझर्स
- डोकेदुखी, चक्‍कर येणे
- हृदयाची धडधड झपाट्याने होणे किंवा वाढणे

----
उष्माघाताचा त्रास झाल्यास त्‍वरित करावयाचे उपाय
- आपत्कालीन वैद्यकीय मदत मिळवा
- व्‍यक्‍तीकडे दुर्लक्ष करू नका. आपत्‍कालीन वैद्यकीय सेवा येईपर्यंत त्‍याच्‍यासोबत/तिच्‍यासोबत राहा.
- व्‍यक्‍तीला सावली व थंडावा असलेल्‍या ठिकाणी न्‍या आणि जॅकेट्स व स्‍कार्फ यांसारखे अतिरिक्‍त कपडे काढा.

-------------
व्‍यक्‍तीला त्‍वरित थंड वाटण्‍यासाठी खालील पद्धतींचा अवलंब करा :
- त्‍वचा ओली करण्‍यासाठी त्‍यांच्‍यावर हलक्‍या प्रमाणात पाणी शिंपडा.
- त्‍वचेवर थंड ओला कापड ठेवा.
- डोके, मान, काख व मांडीवर आइस पॅक ठेवा.
- शक्‍य असल्‍यास त्‍यांना थंड पाणी असलेल्‍या बॅच टबमध्‍ये ठेवा.
- पंखा किंवा एसीसह आसपासच्‍या वातावरणात हवा प्रसारित करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT