Dombivali Political News: शिवसेना (ठाकरे) पक्षाने कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर-राणे यांची उमेदवारी बुधवारी (ता. ३) जाहीर केली.
त्यामुळे या मतदारसंघात श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर असा लढा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरेकर यांनी याआधी २००९ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. (shrikant shinde kalyan news)
कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघात शिवसेना (ठाकरे)कडून उमेदवार कोण असणार, याबाबत अनेक दिवसांपासून विविध अंदाज वर्तवले जात होते. त्यावर दरेकर यांच्या उमेदवारीमुळे पडदा पडला आहे.(political news marathi)
वैशाली दरेकर या मूळच्या शिवसेनेच्याच असून राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर त्या त्यांच्यासोबत गेल्या होत्या. २००९ ला त्यांनी कल्याण-डोंबिवली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्या वेळी काँग्रेसचे वसंत डावखरे आणि शिवसेनेचे आनंद परांजपे हे त्यांच्याविरोधातील उमेदवार होते.(vasihali darekar kalyan )
त्या निवडणुकीत दरेकर यांना एक लाख मते मिळाली होती. त्यानंतर २०१६ मध्ये दरेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पक्षफुटीनंतरही त्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिल्या.(shivsena ubt kalyan)
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हॅटट्रिक करण्याचा विश्वास जाहीर केल्याबद्दल विचारले असता दरेकर म्हणाल्या की, कधी कधी हॅटट्रिक चुकते. या वेळी ती शक्यता जास्त आहे. खासदार शिंदे यांना खासदार करण्यासाठी येथील शिवसेना कार्यकर्त्यांनी मदत केलेली आहे. मला वाटते की शिवसैनिक पुन्हा येथे नवीन खासदार निवडून देतील.
--
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास दाखविला आहे. ठाकरे यांच्यासाठी प्रतिस्पर्धी कोण, हे फार महत्त्वाचे नाही. त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे की मी आजसुद्धा सर्वसामान्य माणसाला खासदार म्हणून निवडून आणू शकतो. सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठे करण्याची शिवसेनेची परंपरा आहे. मी त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.