मुंबई

ठाण्यासाठी भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच

CD

तुर्भे, ता. ४ (बातमीदार) : ठाणे लोकसभा मतदारसंघ आपल्याकडेच असावा, यासाठी महायुतीतील भाजप आणि शिवसेनेत सध्या जोरदार रस्सीखेच निर्माण झाली आहे. एकेकाळी भाजपचा पूर्वापार गड असणाऱ्या ठाणे लोकसभा मतदारसंघात भाजप पुन्हा कमळ फुलवण्यासाठी सरसावला आहे; तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या ठाण्याच्या बालेकिल्ल्यात महायुतीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेलाच मिळावी, यासाठी आग्रही असल्याचे पाहावयास मिळत आहे.
एकेकाळी भाजपचा गड असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघात तत्कालिन शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांनी दावा ठोकत भाजपचा हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेकडे खेचून घेतला. दिघे यांनी प्रकाश परांजपे या नवख्या उमेदवारास या मतदारसंघात उमेदवारी देऊन निवडूनही आणले. तेव्हापासून हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला झाला; मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर हा मतदारसंघ पुन्हा भाजपच्या ताब्यात यावा, यासाठी भाजपने रणनीती सुरू केली आहे. भाजपकडून माजी राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धे यांचे नाव सर्वांत आघाडीवर आहे; तर मागील काळात सलग १५ वर्षे कॅबिनेट मंत्री राहिलेले गणेश नाईक हेही ठाणे लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे समजते. ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार आहेत. महायुतीमधील भाजप आणि शिंदे गटातील विद्यमान आमदारांचे पक्षीय बलाबल पाहता तीन आमदार भाजपचे असून एक अपक्ष महिला आमदार गीता जैन यांनी भाजपला जाहीर पाठिंबा दिला आहे.

-----------
ठाणे, कल्याणसाठी एकनाथ शिंदे आग्रही
१. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे आणि कल्याण दोन्ही मतदारसंघ आपल्या शिवसेनेकडे राहावेत, यासाठी आग्रही आहेत. ठाण्यातून आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, उपनेते विजय नाहटा यांची नावे चर्चेत आहेत; तर कल्याण लोकसभा मतदारसंघातून डॉ. श्रीकांत शिंदे यांना पुन्हा निवणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज आहेत. ठाणे आणि कल्याण दोन्ही जागेवरून भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
२. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून ठाणे आणि कल्याण लोकसभा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवर बैठका सुरू आहेत. दोन्हीपैकी एक मतदारसंघ आपल्या पदरी पाडून घेण्यास भाजप प्रयत्नशील आहे; तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातील ठाणे आणि आपले सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांचा कल्याण असे दोन्ही लोकसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेऊन ठाणे जिल्ह्यावर आपले निर्विवाद वर्चस्व राहावे, यासाठी आग्रही आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT