मुंबई

खाद्यपदार्थ बनवणारा यंत्रमानव वंडरशेफतर्फे बाजारात

CD

खाद्यपदार्थ बनवणारा यंत्रमानव वंडरशेफतर्फे बाजारात

मुंबई, ता. ४ : स्वयंपाकघराला लागणारी वेगवेगळी उपकरणे बनवणाऱ्या वंडरशेफतर्फे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्राचा वापर करून वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या डिश बनवणारा यंत्रमानव शेफमॅजिक तयार केला आहे.
विख्यात शेफ संजीव कपूर यांच्या सव्वादोनशे रेसिपी या रोबोमध्ये आहेत. हा रोबो आपल्या मोबाईलला जोडता येतो. एखादी रेसिपी करण्याची त्याला आज्ञा दिली की त्याला लागणारे कोणकोणते पदार्थ कधी व किती टाकावेत हे तो सांगतो. त्यांचे वजनही करतो, त्यानुसार ते पदार्थ सोलून, कापून, तुकडे करून, दळून त्या पुढची रेसिपी म्हणजे तळणे, शिजवणे हे सर्व प्रकार तो करून ठराविक वेळेत खाद्यपदार्थ तयार करतो. पदार्थ कोणत्या टप्प्यात आहे, त्यात काही घालावे लागेल का, याबाबत व्यवस्थित सूचना आपल्या फोनवर मिळतात, अशी माहिती वंडरशेफचे रवी सक्सेना यांनी दिली. यातील मुख्य भांडे चार लिटरचे असून त्यात सहा ते सात लोकांचे जेवण तयार होते. यात आपल्या विशिष्ट रेसिपीदेखील साठवता येतात. त्याला वायफायशी जोडले की, नव्या रेसिपीदेखील तो आपोआप डाऊनलोड करतो. हे यंत्र तव्याचे काम, म्हणजे पोळ्या, डोसे इत्यादी करत नाही; पण कणिक मळून देते किंवा तव्यावर घालण्याचे अन्य पदार्थांचे मिश्रणही तयार करून देते. विशिष्ट तापमानाला तेथे दहीदेखील बनू शकते, असेही सक्सेना म्हणाले. या यंत्राचे प्रात्यक्षिकही पत्रकारांना दाखवण्यात आले. यात भारतीय, जैन खाद्यपदार्थ तसेच कॉन्टिनेन्टल, थाई, चायनीज, इटालियन, मेक्सिकन आदी खाद्यपदार्थांच्या रेसिपी आहेत, असेही त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT