मुंबई

स्‍मगलींच्‍या नावाखाली ८० लाख रुपयांची लूट

CD

नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर) : सायबर क्राईम, आरबीआय, ईडी व फायनान्स मिनिस्ट्रीचे अधिकारी असल्याचे भासवून एका सायबर टोळीने वाशीमध्ये राहणाऱ्या एका ६३ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीकडून ८० लाख रुपये उकळल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी त्यांच्या नावाने आलेल्या पार्सलमध्ये स्मगलिंगचे साहित्य असल्याची भीती दाखवण्यात आली होती. नवी मुंबईच्या सायबर पोलिसांनी या प्रकरणातील सायबर टोळीविरोधात फसवणुकीसह बनावटगिरी तसेच आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून टोळीचा शोध सुरू केला आहे.
वाशी सेक्टर- २९ मध्ये राहण्यास असलेल्‍या ज्‍येष्ठ नागरिकाशी गत आठवड्यामध्ये सायबर टोळीने फेडेक्स पार्सल डिलिव्हरी कंपनीमधून बोलत असल्याचे भासवून संपर्क साधला होता. तसेच त्यांच्या नावाने आलेल्या पार्सलमध्ये स्मगलिंगचे साहित्य आढळून आल्यामुळे त्याबाबत सायबर क्राईम पोलिसांकडे तक्रार करणार असल्‍याची भीती घातली होती. त्यानंतर टोळीतील इतर साथीदारांनी सायबर क्राईम विभागाकडून बोलत असल्याचे भासवून स्काईप ॲपद्वारे ज्येष्ठ नागरिकाशी संपर्क साधला. त्यानंतर सायबर टोळीने ज्येष्ठ नागरिकाला आरबीआय, ईडी व फायनान्स मिनिस्ट्रीचे बनावट पत्र पाठवून त्यांच्यावर पोलिस कारवाई करण्याची तसेच त्यात त्यांना अटक करण्याची धमकी दिली. त्यानंतर या कारवाईपासून वाचण्यासाठी तसेच त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांची संपत्ती व्हेरिफिकेशन करण्याच्या नावाखाली त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे पाठवण्यास भाग पाडले. अशा प्रकारे त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने एकूण ८० लाख रुपये उकळले. त्यानंतर टोळीने मोबाईल फोन बंद केल्‍याने आपली फसवणूक झाल्याचे ज्येष्ठ नागरिकाच्‍या लक्षात आले. त्यामुळे त्‍यांनी नवी मुंबई सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT