crime news mumbai  Sakal
मुंबई

Crime News: फ्लॅटचे दाखवले आमिश अन् झाली ५० लाखांची फसवणूक; पोलिसांनी केली अटक

वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे |A local court in Bandra has ordered police custody

CD

Andheri: वांद्रेत राहणाऱ्या एका वृद्ध डॉक्टरची ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पळून गेलेल्या आदिल अहमद अलाना या मुख्य आरोपीस वांद्रे पोलिसांनी अटक केली. त्याला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.


आदिल व त्याचा बिल्डर पार्टनर झुल्फिकार हैदर सय्यद यांनी तक्रारदाराकडून फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करून त्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ६२ वर्षांचे तक्रारदार वांद्रेत राहत असून त्यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा आणि सून हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. सहा वर्षांपूर्वी त्यांची आदिलशी ओळख झाली होती.

यावेळी आदिलने तो झुल्फिकार सय्यद यांच्या मालकीच्या वांद्रे येथील बाजार रोडवरील एका मोकळ्या प्लॉटवर इमारतीचे बांधकाम करत असल्याचे सांगून त्यांना तिथे एक फ्लॅट ५५ लाख रुपयांमध्ये देण्याचे आमिष दाखविले होते. त्यांनी झुल्फिकारची भेट घेऊन त्यांच्याकडे इमारतीच्या कागदपत्रांची पाहणी केली होती. त्यानंतर ते सर्वजण इमारतीच्या बांधकाम साईटवर गेले होते.


सर्व खात्री पटल्यानंतर त्यांनी तिथे एक फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला होता. टोकन म्हणून त्यांनी त्याला सुरुवातीला पाच लाख रुपये दिले होते. त्यानंतर त्यांच्यात एक करार झाला होता. त्यात त्यांनी उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने देण्याचे ठरले होते. पूर्ण पेमेंट मिळाल्यानंतर त्यांना २०१९ पर्यंत फ्लॅटचा ताबा देण्याचे मान्य केले होते.

मात्र, दिलेल्या मुदतीत त्यांनी ताबा दिला नाही. विविध कारणे सांगून तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. याच दरम्यान त्यांना आदिलला एका गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली असून तो आर्थर रोड जेलमध्ये असल्याचे समजले होते.

या दोघांकडून फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी वांद्रे पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच दोन्ही आरोपी पळून गेले होते. अखेर आदिलला दीड वर्षांनी अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: मोदींचा मेमरी लॉस... राहुल गांधींनी अमेरिकेच्या माजी अध्यक्षांचा किस्सा सांगत केली तुलना, अमरावतीत फटकेबाजी

Parenting Tips: पालकांच्या 'या' चांगल्या सवयींमुळे मुले होतात शिस्तबद्ध, तुम्हीही करू शकता फॉलो

Mumbai High Court : १८ वर्षाखालील पत्नीशी संबंधही बलात्काराच, उच्च न्यायालयाचे निरीक्षण

Mumbai: काँग्रेसचा 'मुंबईनामा' अदानींना धक्का? पोस्टरवर सोनिया गांधींच्या जागी बाळासाहेबांचा मोठा फोटो, काय आहे जाहीरनाम्यात ?

Jhansi Fire Incident : फायर अलार्म वाजला असता तर वाचला असता 10 मुलांचा जीव!

SCROLL FOR NEXT