sakal
मुंबई

Railway News: आरतीने घेतला टिसीचा 'बाईट'; वाचा नेमक काय घडल

CD

Vasai News: वसई रोड रेल्वेस्थानकावर महिला प्रवाशाने महिला तिकीट तपासनीसाचा चावा घेतल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (ता. ११) संध्याकाळी ही घटना घडली असून या प्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी ३२ वर्षीय महिला प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (mumbai local News)

अथिरा सुरेंद्रनाथ केपी (वय २६) या महिला तिकीट तपासनीस गुरुवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे लोकलमध्ये तिकीट तपासण्याचे काम करत होत्या. संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्या बोरिवली रेल्वे स्थानकातून विरार धीमी लोकलमध्ये चढल्या आणि प्रवाशांच्या तिकीट तपासू लागल्या.(mumbai local marathi news)

या वेळी आरती सुखदेव सिंग (रा. नायगाव) ही महिला प्रवाशी विनातिकीट प्रवास करत असल्याचे आढळले. अथिरा यांनी तिला ३०० रुपये दंड भरण्यास सांगितले. त्यावेळी आरतीने अथिरा यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली.(mumbai local latest News)

त्यानंतर दोघांमधील वाद वाढला. त्यामुळे अथिरा यांनी आरतीला पुढील कारवाईसाठी वसई स्थानकात उतरण्यास सांगितले, मात्र स्थानक येताच तिने संधी पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ती धावू लागल्यावर अथिरा यांनी तिचा पाठलाग करत पकडले.()

या वेळी आरतीने अथिरा यांच्या हाताचा जोरात चावा घेतला. जखमी अवस्थेतील अथिरा यांनी मदतीसाठी पोलिसांना बोलावले. फलाट क्रमांक दोनवरील गस्ती कर्मचाऱ्यांनी आरती सिंगचा पाठलाग करून तिला पकडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT