मुंबई

Lok Sabha : प्रचारसभेसाठी लागणारे मंडप भाडे किती ? निवडणूक खर्चावर आयोगाची करडी नजर

प्रकाश पाटील : सकाळ वृत्तसेवा

पालघर, ता. १६ : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने पारदर्शक, स्वतंत्र, निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया होण्यासाठी कार्यवाही केली जाते. त्याच पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची नोंद केली जाणार आहे. यंदा लोकसभा निवडणूक काळात उमेदवारांना खर्च करण्याच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. आता खर्चाची रक्कम ९५ लाख झाली आहे. या सर्व खर्चावर आयोगाचे लक्ष राहणार असून त्याचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. त्यानुसारच उमेदवाराला व्यवहार करता येणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या खर्चासाठी गठित करण्यात आलेल्या समितीने प्रत्येक वस्तूचे दर निश्चित केले आहेत. या दराबाबत चर्चा, सूचना, तसेच आक्षेप नोंदवण्यासाठी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यानुसार ठरवलेल्या दरामध्ये राजकीय पक्षांनी सूचना केल्या आहेत. त्या सूचनांच्या आवश्यकतेनुसार निवडणुकीत पक्ष, उमेदवारांनी केलेल्या खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने दर निश्चितीस मान्यता दिली आहे.

उमेदवाराने नामांकन दाखल करतेवेळी बँक खात्याचे तपशील सादर करणे आवश्यक राहणार आहे. तसेच, निवडणुकीत नंतर खर्चाचा तपशील सादर करताना बँक खात्याचे विवरणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. उमेदवाराला मतदारसंघात खर्च करण्याबाबत निवडणूक आयोगाने दरपत्रक ठरवून दिले आहे. निवडणूक केवळ पैशांच्या आधारावर लढवली जाऊ नये, यासाठी खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. यात निवडणूक कालावधीत वापरण्यात येणारे जेवण (साधी थाळी) १००, स्पेशल १५०, मच्छी थाळी ३५०, पोहे २०, चहा (साधा) १०, पाणी (एक लिटर) २०, वडापाव १२, झेंडे ५० ते १००, हार २० ते ५० रुपये असे दर निश्चित केले आहेत.

स्वतंत्र बँक खाते आवश्यक

उमेदवाराने नामनिर्देशन दाखल करण्यापूर्वी किमान एक दिवसआधी केवळ निवडणूक खर्चाच्या प्रयोजनासाठी स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक आहे. ही खाते राष्ट्रीयीकृत, सहकारी बँक अथवा पोस्ट कार्यालयात उघडता येणार आहे. निवडणूक प्रयोजनासाठी स्वतंत्र बँक खाते असल्याने उमेदवाराने विद्यमान कोणतेही खाते वापरण्यास बंधनकारक केले आहे. खाते हे उमेदवारांच्या वैयक्तिक नावाने किंवा त्याच्या प्रतिनिधींच्या संयुक्त नावे उघडता येईल. खाते फक्त लोकसभा निवडणूक २०२४ च्या जमाखर्चासाठीच वापरता येणार आहे. त्यामध्ये इतर कोणताही व्यवहार करता येणार नाही. उमेदवार स्वतःच्या निधीसह इतर सर्वांतून प्राप्त होणारा निधी खात्यात जमा करणे आणि खर्चाचे व्यवहार याच खात्यातून करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

रोखीवर मर्यादा

निवडणूक कालावधीत उमेदवाराला एक व्यक्ती वा संस्थेकडून दहा हजार रुपये इतकीच रक्कम देणगी अथवा रोख स्वरूपात स्वीकारता येणार आहे. दहा हजारांपेक्षा अधिक रक्कम रोखीने अदा करता येणार नाही. उमेदवाराने सर्व व्यवहार धनादेश आरटीजीएस अथवा ऑनलाईन पद्धतीने करणे अपेक्षित आहे.

खर्चावर राहणार नजर

आचारसंहितेच्या कालावधीत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा तातडीने निपटरा करण्यासाठी निवडणूक आयोगाने मोबाईल ॲप विकसित केले आहे. यामध्ये मतदाराला एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याचे या ॲपमध्ये छायाचित्र अथवा व्हिडीओ काढून तक्रार नोंदवता येणार आहे. त्यावर जिल्हा प्रशासन तसेच मुख्य निवडणूक कार्यालयाकडून तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे. उमेदवाराच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथकेही तैनात केली आहेत.

प्रचारसभेसाठी लागणारे मंडप भाडे

१. प्रचारसभांसाठी लागणाऱ्या मंडपासाठी चौरस मीटर २९ रुपये ५० पैसे असा दर ठेवला आहे.
२. वॉटरप्रूफ मंडप आणि पेंडॉलसाठी प्रति चौरस फूट ४७ रुपये २० पैसे असे दर राहणार आहेत.
३. सोफा सेट, टी पॉयसह प्रति नग प्रति दिन ४०० रुपये, व्हीआयपी चेअर प्रति नग ६०, प्लास्टिक खुर्च्या प्रति नग १५ रुपये, रिवॉल्विंग चेअर प्रति दिन प्रति नग ७० रुपये ८० पैसे असे दर निश्चित केले आहेत.
४. लाऊड स्पीकर ध्वनिक्षेप मिक्सरसह प्रति दिन दोन हजार ०१७, माइक कॉलर, कॉडलेस माईक प्रति दिन दोन हजार ८७० रुपये, ड्रोन कॅमेरा चालकासह प्रति दिन पाच हजार रुपये असा दर ठरवला आहे.

खालील मुद्दे अपेक्षित

खर्चाचा प्रकार दर
जेवण (साधी थाळी) १००, स्पेशल १५०
अंडा थाळी १२०
मटण २००
मच्छी थाळी ३५०
पोहे २०
चहा(साधा) १०
पाणी (१ली) २०
वडापाव १२
शीतपेय (छापील किमतीनुसार)
फेटा १०० ते २५०
फटाक्यांची माळ १००० प्रति नग ३५०
१० हजारांची माळ - प्रती नग ३२००
पुष्पगुच्छ १००
टोपी १० साधी
झेंडे ५० ते १२० रुपये
मफलर ४० ते ६०
बिल्ले १२० ते १५०
नारळ २०
हार २० ते ५०
सीलिंग फॅन २९५ (प्रति दिन)
पॅडल फॅन २०० (प्रति दिन)
(स्थानिक गरजेनुसार प्रकार बदलता येतील)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT