Shivsena govinda  sakal
मुंबई

Shivsena: विदर्भ, मराठवाड्यात गोविंदा शिवसेनेचे स्टार कॅम्पेनर

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: शिवसेनेत अलीकडे प्रवेश केलेले अभिनेते गोविंदा शिवसेनेसाठी स्टार प्रचारक ठरले आहेत. विदर्भ, मराठवाड्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्यानंतर गोविंदा पक्षासाठी क्राऊड पुलरची भूमिका बजावत आहेत. गेल्या १० दिवसांत त्यांनी १० पेक्षा अधिक रोड-शो, प्रचारसभा केल्या आहेत.


काँग्रेसकडून २००४ मध्ये राम नाईक यांना हरवून जायंट किलर ठरलेल्या गोविंदा यांनी पाच वर्षांनंतर राजकारणातून संन्यास घेतला होता. १४ वर्षांनंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला.

त्यानंतर शिवसेनेने गोविंदा यांना थेट विदर्भात पक्षाच्या प्रचारासाठी उतरवले आहे. गेल्या दहा दिवसांपासून ते विदर्भ, मराठवाड्यात मुक्कामी होते. या काळात त्यांनी रामटेक, यवतमाळ- वाशीम आणि हिंगोली या तीन मतदारसंघांत दहापेक्षा जास्त रोड-शो केले.

संध्याकाळनंतरच प्रचार


विदर्भातील रणरणत्या उन्हात गोविंदा दुपारी प्रचार करणे टाळतात. संध्याकाळी ४.३० नंतर ते प्रचाराला उतरतात. तत्पूर्वी पक्षाकडून गोविंदा यांना माहिती पुरवली जाते. गोविंदांसाठी मराठी उत्तम असल्यामुळे हे काम सोपे होते.

गेल्या १० दिवसांत गोविंदा यांनी शहरी भागासोबत खापा, कळमनुरी, उमरी, सावनेरसारखा ग्रामीण भागही पिंजून काढला आहे. तब्बल चार जिल्ह्यात १० रोड-शो केले, तर रखरखत्या उन्हात पार पडलेल्या दोन कार्यकर्ता मेळाव्यांतही ते सहभागी झाले होते.



क्रेझ कायम


हिंगोली, यवतमाळ-वाशीममध्ये पक्षाने उमेदवार बदलले. गोविदांच्या उपस्थितीमुळे या नव्या चेहऱ्यांचा प्रचारात वेग आल्याचे सांगण्यात आले. प्रत्येक रोड-शोला जमलेली गर्दी बघता विदर्भ आणि मराठवाड्यात गोविंदा यांची क्रेझ अजूनही कायम असल्याचे दिसून येते.

गोविंदा मध्यंतरी राजकारणात होते, ती बाब लोक विसरले आहेत. आता ते अभिनेता गोविंदा यांना बघायला येत असल्याचे सांगत आहेत. ग्रामीण भागात अजूनही हॉटेल, टपऱ्यांवर त्यांची गाणी वाजत असतात. त्यामुळे या भागात त्यांचे स्टारडम कायम असल्याचे स्पष्ट होते. मात्र अभिनेत्याला बघायला होणाऱ्या गर्दीवरून केवळ त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येतो; मात्र मतदार त्यांच्या आवाहनाला गंभीरपणे घेतील का, ते मात्र सांगता येत नाही.



प्रचार असा


रामटेक- तीन दिवसांत ६ रोड-शो
हिंगोली- तीन दिवसांत ३ रोड-शो, मेळावा
यवतमाळ-वाशीम- चार दिवसांत ३ रोड-शो
बुलडाणा- कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी
...
मला निवडणूक लढायची नाही, मी उमेदवारीही मागितली नाही. माझ्यासाठी ही एक नवीन सुरुवात आहे.


- गोविंदा, अभिनेते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT