Mumbai News: दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ काँग्रेसला न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या वर्षा गायकवाड या आता शिवसेना उमेदवारासाठी मैदानात उतरल्या आहेत. या मतदासंघात शिवसेनेकडून अनिल देसाई यांना उमेदवारी मिळाली आहे. (mumbai congress)
त्यांच्या प्रचारासाठी शिवसेना व इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची दादर येथे बैठक झाली. धारावीमधून सर्वाधिक मताधिक्य मिळवून देऊ, असा विश्वास वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला. सर्वांनी एकदिलाने काम करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
या बैठकीला ‘इंडिया आघाडी’च्या सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये काँग्रेसचे खासदार चंद्रकात हंडोरे, आमदार भाई जगताप, माजी खासदार हुसेन दलवाई, शिवसेनेकडून श्रद्धा जाधव, आमदार प्रकाश फातर्फेकर, दिवाकर रावते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव, आम आदमी पक्षाच्या प्रिती मेननही या बैठकीला हजर होत्या.
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यामुळे वर्षा गायकवाड या नाराज झाल्या होत्या. या मतदारसंघात काँग्रेस सातत्याने लढत असल्यामुळे त्यावर काँग्रेसने दावा केला होता. त्यांच्या नाराजीमुळे शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारातून काँग्रेसचे कार्यकर्ते गायब झाले होते. दिल्लीतही गायकवाड यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकर्जुन खर्गे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची भटी घेतली. मात्र त्यांना जागा वाटपात तडजोड करावी लागते, त्यामुळे कामाला लागण्याच्या सूचना हायकमांडने दिल्याचे कळते. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी घेतलेली ही पहिली बैठक आहे.
दक्षिण मध्य मतदारसंघातील खासदाराने लोकसभेत स्थानिक प्रश्न मांडले नाहीत. रेल्वेचे प्रश्न मांडले नाहीत, धारावीतील ७ लाख लोकांना बेघर केले जात आहे, पण त्यावर खासदार संसदेत बोलले नाहीत, असा टोलाही गायकवाड यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांनी ज्यांना महापालिकेच्या स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष केले, दोनदा खासदार केले, ते उद्धव ठाकरेंचे झाले नाहीत तर जनतेचे काय होणार, असा सवाल करत गायकवाड यांनी तोफ डागली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.