Mumbai News: समाजाचा अविभाज्य घटक असूनही नेहमीच उपेक्षित राहिलेल्या तृतीयपंथींचे (किन्नर) मुंबईत शहर आणि उपनगरात एक हजार ३४ एवढे मतदार आहेत. महिला-पुरुषांबरोबरच स्वतंत्र घटक म्हणून गेल्या बारा वर्षांपासून मतदार यादीत त्यांची स्वतंत्र नोंद आहे.
सध्याची मुंबईतील राजकीय उलथापालथ पाहता लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत तृतीयपंथींचा कुठल्या पक्षाकडे कल आहे, याची चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयार केलेल्या मतदार याद्यांनुसार मुंबई शहरात २२२ तर उपनगरात ८१२ एवढी तृतीयपंथी मतदारांची संख्या आहे.
तर उपनगरातील मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ३३९ तृतीयपंथी मतदार राहतात. मतदानाचा हक्क मिळाला मात्र आम्हाला भेडसावणाऱ्या समस्याकडे कुणीच लक्ष देत नसल्याची तृतीयपंथींची खंत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत तृतीयपंथींची कोणाला साथ मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काय आहेत समस्या?
मुंबईत वास्तव्याला असलेला तृतीयपंथी समाज सध्या विविध समस्यांचा सामना करत आहे. सरकारी नोकरी, आरक्षण, आवास योजना, वृद्धाश्रम, आधार कार्ड, रेशन कार्डपासून वंचित आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्यासाठी विशेष बाब म्हणून योजना राबवावी, अशी मागणी राबविणे आवश्यक असल्याचे मत ट्रान्सजेंडर समाजासाठी काम करत असलेल्या दिशा पिंकी शेख सांगतात.
तृतीयपंथी मतदार असलेले प्रमुख विभाग
मालाड : ३३९
घाटकोपर पश्चिम - १२०
दहिसर - ४५
मानखुर्द शिवाजीनगर - ३९
भांडुप पश्चिम - ३२
अणुशक्ती नगर - ३१
दिंडोशी - २६
मुलुंड - २३
घाटकोपर पूर्व - २०
आम्हाला समाजात नेहमीच दुय्यम स्थान दिले जाते. त्यामुळे सर्वच ठिकाणी कुचंबणा होत आहे. शासकीय यंत्रणेने सन्मानजनक जीवन जगता यावे, म्हणून उपाययोजना कराव्यात.
- दिशा पिंकी शेख, ट्रान्सजेंडर सामाजिक कार्यकर्त्या
सरकार तृतीयपंथींकरिता विविध योजनाची घोषणा करते; मात्र त्याची योग्य अंमलबजावणी होताना दिसत नाही. तसेच कल्याणकारी मंडळांकडे तृतीयपंथी समाजाच्या कल्याणाकरिता सुमारे २० कोटी रुपयांचा निधी दिला जातो, मात्र तो खर्चही होत नाही.
- डॉ. सलमा खान, अध्यक्षा, किन्नर माँ संस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.