मुंबई

पीपीपी तत्वावर बहुमजली वाहनतळ, वाणिज्य संकुल

CD

नवी मुंबई, ता. २५ (वार्ताहर) : सिडकोने बेलापूर व वाशी येथे दिलेल्या सार्वजनिक वाहनतळाच्या भूखंडावर आता सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप-पीपीपी) बहुमजली (मल्टीस्टोरीड) वाहनतळासोबत वाणिज्य संकुल (कमर्शिअल कॉम्फ्लेक्स) उभारण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. सिडकोने संबंधित भूखंडाच्या वाणिज्य वापरातून महापालिकेला मिळणाऱ्या नफ्याच्या उत्पन्नातील २५ टक्के हिस्सा सिडकोला देण्याच्या अटीवर महापालिकेला भूखंडाच्या वापर बदलास तात्पुरते ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही भूखंडावर पीपीपी तत्वावर बहुमजली वाहनतळासह वाणिज्य संकुल उभारण्याचा महापालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
गत जानेवारी महिन्यात तत्कालीन नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी बेलापूर व वाशी येथील वाहनतळाच्या भूखंडावर बहुमजली वाहनतळ व वाणिज्य संकुल उभारण्यासाठी दोन्ही भूखंडाचा वापर बदल करण्याकरिता सिडकोकडे ना हरकत प्रमाणपत्र देण्याची विनंती केली होती. त्यानंतर सिडकोने सार्वजनिक वाहनतळाच्या भूखंडाचा वापर करण्यास तात्पुरते ना हरकत प्रमाणपत्र देऊन नवी मुंबई महापालिकेस बहुमजली वाहनतळ व वाणिज्य संकुल उभारण्यास मंजुरी दिली आहे. मंजुरी देताना नवी मुंबई महापालिकेला वाहनतळ व वाणिज्य संकुलाच्या वापरातून मिळणाऱ्या नफ्यातील २५ टक्के हिस्सा सिडकोला देण्याची अट घातली आहे. तसेच भूखंड अथवा त्याचा काही भाग कोणाच्याही नावे महापालिकेला हस्तांतरीत करता येणार नसून भविष्यात वाहनतळ उभारण्यासाठी नवी मुंबई महापालिकेला अन्य स्वतंत्र भूखंड देणार नसल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.

----------
बेलापूर, वाशीमध्ये सात कोटींचे भूखंड
नवी मुंबई महापालिकेला सार्वजनिक वाहनतळ उभारणीसाठी सिडकोने बेलापूर सेक्टर १५ येथे तब्बल ६७६० चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड क्र. ७२ हा राखीव किंमतीच्या २५ टक्के दराने म्हणजेच १ कोटी १८ लाखाला ऑगस्ट २०१५मध्ये दिला आहे. तसेच वाशी सेक्टर ३० ए येथे ११,९०४ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड क्र. ३६ ए हा राखीव किंमतीच्या २५ टक्के दराने म्हणजेच ५ कोटी ९८ लाख ४६ हजाराला सप्टेंबर २०१८ मध्ये वितरित केला होता. मात्र, गेल्या ८-९ वर्षांपासून महापालिका या दोन्ही भूखंडावर सार्वजनिक वाहनतळ उभारू शकली नाही.
-------
सिडकोने बेलापूर व वाशी येथे दिलेल्या भूखंडावर पीपीपी तत्वावर बहुमजली वाहनतळ आणि वाणिज्य संकुल उभारण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर वाहनतळ व वाणिज्य संकुलाचा मार्ग मोकळा होणार आहे.
- संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT