मुंबई

लग्नसराईचे केवळ चारच दिवस

CD

लग्नसराईचे केवळ चारच दिवस

ठाणे, ता. २५ (बातमीदार) : सध्या निवडणुकीसोबतच लग्नसराईचे दिवस सुरू आहेत; मात्र यंदा लग्नाचे मुहूर्त फार कमी आहेत. मे महिन्यात केवळ दोन मुहूर्त आहेत. त्यामुळे केवळ चारच दिवस शिल्लक असल्याने वधू व वर पक्षाची लगीनघाई सुरू झाली आहे. तसेच एकाच दिवशी चार ते पाच विवाह नोंदविण्यात आले आहेत. यामुळे विवाह नोंदणी कार्यालयांपासून छोटी-मोठी सभागृहे ७० ते ८० टक्के हाऊसफुल्ल झाले आहेत.

यंदा मे महिन्यात विवाह मुहूर्त फक्त दोनच दिवस आहेत. एकाच मुहूर्तावर अनेकांचे विवाहाचे बार उडणार आहेत; मात्र यंदा तीव्र उन्हाळा असल्याने वऱ्हाडी मंडळींना लग्न समारंभाला विशेष काळजी घ्यावी लागली आहे; परंतु या उन्हाळ्यातील लग्नसराईमुळे व्यापाऱ्यांना मात्र सुगीचे दिवस आले आहेत. तसेच मंडप डेकोरेटर्ससाठी वधू-वरांची न्यू ट्रेंडिंग मागणी असल्यामुळे हॉलचे दरही त्यानुसार वाढले आहेत.

ठाण्यातील ७० ते ८० टक्के हॉलची बुकिंग झाली आहे. विवाह नोंदणी, हॉटेल्स, शाळेची मैदाने असे विविध पर्याय असतानाही हॉलच्या बुकिंग हाऊसफुल्ल आहेत. अनेकजण शाही थाटात, हॉटेल्स, लॉन्स, सजावट असलेला हॉल आदींची निवड बजेटनुसार करतात. मात्र, तरीही सर्वसाधारण आणि मध्यम हॉल बुकिंग हाऊसफुल्ल आहेत. हॉलमध्ये पूर्वी फुलांची सजावट करण्याची मागणी होत असे; परंतु यावर्षी नवीन ट्रेडिंगनुसार एलईडी, मूड लाइटिंग, डिस्को डेकोर, वेस्टन थीम, डोली असे सजावट असलेल्या हॉलला जास्त मागणी आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय नागरिकांना लग्नासाठी खर्चदेखील तितकाच वाढत आहेत, असे हॉल मालकांनी सांगितले.

मेहंदीमुळे रोजगार
लग्न समारंभात सौंदर्य खुलवणारी मेहंदी काढण्याची पारंपरिक पद्धत आजही टिकून आहे. विशेष म्हणजे, मेहंदी काढण्याची क्रेझ दिवसेंदिवस तरुण वर्गामध्ये वाढीस लागली आहे. याकडे केवळ संस्कृतीचा भाग म्हणूनच नव्हे, तर आताची तरुण पिढी आर्थिक व्यवसायाचे साधन म्हणूनदेखील पाहत आहे. हल्ली अनेक जण करिअर म्हणूनदेखील मेहंदी कोर्स निवडतात. कमी खर्चात व कमी वेळेत मेहंदी काढण्याचे चांगले पैसे मिळत असल्याने मेहंदी कोर्सकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले जात आहे.

शीतपेये विक्रेत्यांची सुगी
लग्न समारंभात जेवणासोबत शीतपेय असतेच; परंतु या वाढत्या तापमानामुळे लग्नातील मंडळींना जेवणापेक्षा थंड खाद्यपदार्थांचे स्टॉल्स अधिक ठेवावे लागणार आहेत. यामुळे शीतपेय विक्रेत्यांना‌ तसेच आईस्क्रीमचे स्टॉल लावणाऱ्या विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे वधू-वराच्या खर्चातही वाढ होणार आहे.

जून, जुलै, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यातील बुकिंगसुद्धा आतापासूनच करण्यात आले आहेत. तसेच मे महिन्यामध्ये दोनच मुहूर्त असले तरी ७, ८, १०, १२ या तारखांना काहींनी मुहूर्त काढून हॉल बुकिंग केले आहेत. हॉलमध्ये नवीन ट्रेंडिंग सजावटीच्या मागणीनुसार बजेट वाढत आहे.
- विनोद शिंदे (मंगल कार्यालयाचे मालक)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT