Navi Mumbai News: नेरूळ सेक्टर-१५ भागात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या बांग्लादेशी जोडप्याला व त्यांच्या मुलीला नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे. हे तिघेही बांग्लादेशी नागरिक मागील १७ वर्षांपासून नवी मुंबईत राहत असल्याचे व त्यांनी भारतातील आधार कार्ड आणि पॅन कार्ड बनवून घेतल्याचे उघडकीस आले आहे.
नेरूळ पोलिसांनी या तिघांविरोधात पारपत्र (भारतात प्रवेश) व विदेशी व्यक्ती अधिनियम तसेच बनावट कागदपत्र बनविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांच्याविरोधात पुढील कार्यवाहीला सुरुवात केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान नेरूळ पोलिसांचे पथक गस्त घालत असताना, नेरूळ सेक्टर-१५ मधील जामा मस्जिदजवळ एक बांग्लादेशी नागरिक अवैधरीत्या व्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी सेक्टर-१५ मध्ये जाऊन शोध घेतला असता, अब्दुल सबुर अब्दुल सुबान शेख (वय ५५) हा त्या ठिकाणी व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, तो त्याची पत्नी व मुलगी यांच्यासह त्याच भागात राहत असल्याचे सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी एनएल-२ बिल्डींगमध्ये जाऊन तपासणी केली असता, त्याठिकाणी अब्दुल सबुर त्याची पत्नी तेहमिना अब्दुल सबुर शेख (४२) व त्यांची मुलगी हलिमा अब्दुल सबुर शेख (२१) राहत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता,
त्यांनी कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्राशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश केल्याचे निष्पन्न झाले. तसेच ते मागील १७ वर्षांपासून भारतात राहत असल्याचे व त्यांनी बनावट कागदपत्राच्या आधारे भारतातील आधार कार्ड व पॅन कार्ड बनवून घेतल्याचे आढळून आले. त्यानंतर नेरूळ पोलिसांनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.