मुंबई

बेलापूर टेकडी बचावासाठी मानवी साखळी

CD

बेलापूर टेकडी बचावासाठी मानवी साखळी
नेरूळ, ता. २९ (बातमीदार) : बेलापूर टेकडीवरील अतिक्रमणाकडे सिडकोचे दुर्लक्ष होत असल्‍याने त्‍याकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमींनी रविवारी मूक मानवी साखळी तयार केली. ‘सेव्ह बेलापूर हील्स’ आणि ‘स्टॉप मर्डर ऑफ ट्रीज’ अशा घोषणा देणारे बॅनर घेऊन रहिवाशांनी एमजीएम हॉस्पिटल जंक्शनजवळ मानवी साखळीच्‍या माध्यमातून सिडको, पालिकेचा निषेध केला.
नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यावेळी म्हणाले की, टेकडीवर अनेक बेकायदेशीर मंदिरे उभी राहिली आहेत. रहिवाशांनी नऊ वर्षांपूर्वी इशारा देऊनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. नॅटकनेक्टच्या तक्रारीला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाला या समस्येची चौकशी करण्यास सांगितले होते. मात्र, अद्यापही सिडकोकडून याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. तसेच इमारतींमुळे टेकडी कमकुवत होऊ शकते. आगामी पावसाळ्यात भूस्खलनाची शक्‍यता नाकारता येत नाही; परंतु अद्यापही सिडकोने याबाबत कार्यवाही केलेली नसल्‍याचे कुमार यांनी सांगितले. त्‍यामुळे बेलापूर टेकडीवर अतिक्रमण वाढत असल्याची खंत स्थानिक रहिवासी कपिल कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे. बेकायदेशीर बांधकामांना पाणी आणि वीजजोडणी मिळते, हे धक्कादायक असल्याचे रहिवासी हिमांशू काटकर म्हणाले. टेकडीवरील चौफेर अतिक्रमणांमुळे प्रचंड नुकसान होत आहे. त्‍यामुळे दरडी कोसळण्याची भीती असल्याचे हिल व्ह्यू रो-हाऊस सोसायटीतील दशरथ भुजबळ यांनी सांगितले. उच्च अधिकारी सतत दुर्लक्ष करत असून, हे धक्कादायक असल्याचे सांगत इर्शाळवाडी भूस्खलनासारख्या दुर्घटनेतून कोणताही धडा घेत नसल्याची खंत खारघर टेकडी आणि वेटलँड समूहाच्या ज्योती नाडकर्णी यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT