Kalyan News sakal
मुंबई

Kalyan News: भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस; ११ जणांना घेतला चावा

सकाळ वृत्तसेवा

Kalyan News: हनुमान नगर परिसरात भटक्या श्वानाने ११ जणांना चावा घेतल्याची घटना रविवारी घडली आहे. यामुळे येथील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी (ता. २८) सायंकाळी सातच्या सुमारास भटक्या पिसाळलेल्या श्वानाने हनुमान नगर परिसरातील लहान मुले आणि महिला-पुरुषांसह तब्बल ११ जणांना चावा घेतला.

यामध्ये पाच ते सहा मुलांचा समावेश आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घाबरलेले नागरिक रात्री बाहेर निघताना हातात अक्षरश : काठ्या घेऊन बाहेर पडत होते. भटक्या कुत्र्याने चावा घेतलेल्यांवर रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार करण्यात आले.

भटक्या श्वानांमुळे येथून ये-जा करणारे नागरिक, शाळेत जाणारी लहान मुले, वृद्ध नागरिक, महिला तसेच दुचाकी वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे; मात्र या परिस्थितीवर उपाययोजना करण्यात कल्याण- डोंबिवली महापालिका प्रशासन अकार्यक्षम ठरत आहे. कल्याण शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर मोकाट श्वानांच्या संख्येमुळे रात्री-बेरात्री त्यांच्या भुंकण्याचा आवाजाने येथील नागरिकांची झोप उडाली आहे.

पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेत लहान मुलांना जखमी केल्याच्या अनेक घटना यापूर्वी ही अनेकदा घडल्या आहेत; मात्र असे असतानाही कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासन कुठलीही ठोस उपाययोजना करताना दिसत नाही. मोकाट कुत्रे हे रस्त्यावर वाहनांच्या आडवे आल्याने अनेकदा अपघाताच्या घटनाही घडत आहेत.

कल्याण शहर परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. जखमी झालेले कुत्रे पिसाळल्याने ते अनेकांच्या अंगावर येऊन चावा घेण्याचा घटना परिसरात घडत आहेत. त्यांचा तत्काळ बंदोबस्त व्हावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

या घटनेसंदर्भात मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र होऊ शकला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT