मुंबई

महायुतीच्या विजयासाठी रयत क्रांती पक्षाच्या घोंगडी बैठका

CD

पक्षनीती

महायुतीच्या विजयासाठी रयत क्रांती पक्षाच्या घोंगडी बैठका

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवत दहा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या रयत क्रांती पक्षाने माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीच्या विजयासाठी कंबर कसली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे असलेल्या या पक्षाने घोंगडी बैठकांवर जोर दिला आहे. केंद्रातील मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत केलेली विकासकामे ते घराघरात पोहोचवत आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्याशी मतभेद झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती पक्षाची स्थापन करत महायुतीसोबत राहिले. राज्यात सुमारे तीन-चार वर्षे मंत्री राहिलेल्या खोत यांनी आपल्या पक्षाचे जाळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या माध्यमातून घट्ट केले आहे. त्याच जोरावर ते आता महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी मेहनत घेत आहेत. त्यासाठी घोंगडी बैठका, चौक सभा घेतल्या जात असल्याची माहिती पक्षाचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी सांगितले.
निवडणुका जिंकण्यासाठी रणनीतीची आवश्यकता असते. त्याचा भाग म्हणून रयत क्रांती पक्षाचे कार्यकर्ते भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्यासह घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. तसेच मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी कार्यकर्ते महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे दीपक भोसले यांनी सांगितले.
-----------------------
प्रभाव असलेले जिल्हे
रयत क्रांती पक्षाचा मूळ पाया हा शेतकरी आहे. त्यामुळे पक्षाचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात आहे. त्याचबरोबर नाशिक, ठाणे जिल्ह्यात कल्याण, रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल येथे तर मुंबईत काळाचौकी, करिरोड, भांडुप, मानखुर्द, घाटकोपर येथेही पक्षाचे कार्यकर्ते आहेत.
----------------------
असे सुरू आहे नियोजन
- मोदी सरकारने आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोचवण्यास सुरुवात
- पक्षाचा प्रभाव असलेल्या मतदारसंघात ४०-५० कार्यकर्ते कार्यरत
- महायुतीच्या प्रचारासाठी घटक प्रमुख पक्षांसोबत बैठका
- सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न
-----------------------
गेल्या दहा वर्षांपासून आमचा पक्ष महायुतीचा घटक पक्ष आहे. त्यामुळे कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी काम करत आहेत. सरकारची विधायक कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम शिस्तबद्धरीतीने करत आहेत.
- दीपक भोसले, राज्य कार्याध्यक्ष, रयत क्रांती पक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT