मुंबई

विद्यार्थ्यांना मिळाला ध्वजारोहणाचा बहुमान

CD

विद्यार्थ्यांना मिळाला ध्वजवंदनाचा बहुमान
रोहा, ता. १ (बातमीदार) : तालुक्यातील खांब येथील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळाच्‍या शिक्षण संस्थेने १ मे महाराष्ट्र दिनाच्‍या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी वर्गाच्या हस्ते ध्वजवंदन करून त्‍यांना बहुमान देण्यात आला. संस्थेकडून तिन्ही विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याऱ्या विद्यार्थांना ध्वजवंदनाचा बहुमान देण्यात येईल, असा ठराव करण्यात आला होता. या ठरावानुसार रा. ग. पोटफोडे (मास्तर) विद्यालयातील मधुरा समीर सुतार, श्रमिक विद्यालयातील दिशा दत्तात्रेय हळदे, न्यू इंग्लिश स्कूल विठ्ठलवाडी येथील आर्या मोरे यांच्‍या हातून महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले.
.............................
कामगार दिनानिमित्त आयुक्‍तांकडून स्वच्छताकर्मींचा सन्मान
वाशी, ता. १ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४व्या वर्धापन दिनानिमित्त नवी मुंबई महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडले. यावेळी आयुक्‍तांकडून स्वच्छताकर्मींचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार व शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार, शहर अभियंता संजय देसाई, तसेच विभागप्रमुख, अधिकारी- कर्मचारीवृंद, अग्निशमन दलाचे जवान, अतिक्रमण विभागाचे पोलिस अधिकारी- कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्वांना महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र दिनाप्रमाणेच आज आंतरराष्ट्रीय कामगार दिनही असल्याचा विशेष उल्लेख करीत देशाच्या प्रगतीत कामगारांचे मोठे योगदान असल्याचे सांगत आयुक्तांनी कामगार दिनानिमित्त महापालिकेच्या स्वच्छता कामगारांचा सन्मान करताना आनंद होत असल्याचे सांगितले. कामगार दिनाचे औचित्य साधून प्रातिनिधिक स्वरूपात शहर स्वच्छतेत योगदान देणाऱ्या प्रत्येक विभागातील एक स्वच्छताकर्मी अशा आठ स्वच्छताकर्मींचा आयुक्तांच्‍या हस्ते सन्मान करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT