मुंबई

‘खो- खो’ च्या खेळात नरेश म्हस्केंची बाजी

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : ठाण्यात उमेदवारीवरून महायुतीत रंगलेला ‘खो खो’चा खेळ अखेर संपला आहे. या मैदानात अगदी सुरुवातीला संभाव्य उमेदवार म्हणून उतरलेले शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी सर्व इच्छुकांना बाद करून शेवटपर्यंत डाव राखला. असे असले तरी खरा ‘कबड्डीचा’ खेळ पुढे आणखी रंगणार असल्याचे चित्र दिसत आहे. आपल्याला उमेदवारी मिळेल, या आशेवर गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भाजप- शिंदे गटाच्या डझनभर इच्छुकांचा हिरमोड झाल्याने त्यांची म्हस्केंना कितपत साथ मिळते, हे आता पाहावे लागणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील कल्याण व ठाणे लोकसभेसाठी महायुतीत जबरदस्त रस्सीखेच सुरू होती. दोन्ही मतदारसंघावर भाजप व शिवसेना शिंदे गटाने दावा ठोकला होता. त्यापैकी कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असतील, याची घोषणा खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यामुळे ठाणे भाजपच्याच ताब्यात पुन्हा येणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. यादरम्यान दोन्ही पक्षांच्या इच्छुक उमेदवारांना तयारीला लागा, असे संकेत देण्यात आले. यातून संजीव नाईक की प्रताप सरनाईक अशी स्पर्धा सुरू झाली. या दोन्ही नावांना भाजपश्रेष्ठींची पसंती होती. प्रताप सरनाईक यांनी तर आपण ठाणे लोकसभा लढवणार आहे, असे सांगत पोलिस आयुक्तालयांकडून क्रिमिनल रेकॉर्ड मागवला. तर दुसरीकडे संजीव नाईक हे थेट प्रचारालाच लागले होते.

प्रताप सरनाईक व संजीव नाईक यांच्या नावांचा खो-खो सुरू असताना भाजप आणि शिंदे गटाच्या अनेक खेळाडूंनीही ‘है तयार हम’ म्हणत इच्छा दर्शवली. यात सुरुवातीच्या टप्प्यात शिवसेना शिंदे गटाकडून माजी महापौर नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक यांचे नाव चर्चेत राहिले. तर भाजपकडून माजी खासदार संजीव नाईक, विनय सहस्रबुद्धे यांच्या नावाची चर्चा होती. या यादीत नंतरच्या काही दिवसांत शिवसेनेकडून विजय नाहटा, आमदार प्रताप सरनाईक ते कालपरवा माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या नावाचीही चर्चा होती. भाजपमध्येही आमदार संजय केळकर यांनी संधी दिली तर सोने करू, अशी इच्छा दर्शवली. ही चर्चा रंगत असतानाच पत्रकाराच्या संभाव्य नावाने आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून केवळ हा मतदारसंघ कुणाला मिळणार आणि कोण निवडणूक लढवणार या मुद्यावरच चर्चेचे गुऱ्हाळ सुरू राहिले.

कॅप्टनकडून पसंतीचा खेळाडू
ठाणे लोकसभा निवडणुकीच्या मैदानात अनेक मातब्बर खेळाडू उतरण्यास तयार होते; मात्र त्याआधी भाजपचा दावा असलेला हा मतदारसंघ राखण्याचे आव्हान पक्षाचे कॅप्टन असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर होते. त्यात त्यांना यश आल्यावर भाजपच्या सर्व इच्छुक उमेदवारांची नावे आपोआप बाद झाली. त्यातही चिन्ह तुमचे, उमेदवार आमचा हा फॉर्म्यूलाही त्यांनी फेटाळून लावला. यासर्व चर्चेत शिवसेना शिंदे गटाचे राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उत्तम बाजू सांभाळली. खरेतर त्यांच्याच नावाची सुरुवातीला चर्चा होती; पण नंतर ते बॅकफूटवर जाणार की काय असे असताना त्यांनी ठाण्यात सखी महोत्सव यशस्वी करून दाखवला. त्यामुळे कॅप्टनकडून त्यांच्या नावाला पसंती मिळाली, असे समजते.

इतर खेळाडूंची धडपड वाया
संभाव्य उमेदवारीच्या खेळात आमदार प्रताप सरनाईक आणि माजी खासदार संजीव नाईक यांच्यात अटीतटीचा सामना रंगला होता. प्रताप सरनाईक यांनी आपण लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे एकप्रकारे जाहीर करून आर्थिक रसदही जमा केली होती. तर दुसरीकडे संजीव नाईक यांनी अर्धा प्रचारही पूर्ण केला होता; मात्र आता या दोघांची धडपड पूर्णपणे वाया गेल्याची चर्चा रंगली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT