मुंबई

नेहरू सेंटरच्या वतीने विनामूल्य कला कार्यशाळा

CD

नेहरू सेंटरच्या वतीने विनामूल्य कला कार्यशाळा
लावणी नृत्यांगनांना माया जाधव यांचे मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : वरळीच्या नेहरू सेंटरच्या वतीने लावणी नृत्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. नवकलाकारांमध्ये असलेले आकर्षण लक्षात घेऊन नेहरू सेंटरने ‘तूच माझी सखी’ या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. नृत्य समशेर, अभिनेत्री, लावणी नृत्यांगना माया जाधव यांचे मार्गदर्शन या शिबिराला लाभणार आहे.
बासरी वादनासाठी पं. सुनील कांत गुप्ता यांचे, कथ्थक नृत्यासाठी बिरजू महाराज यांच्या शिष्या सश्वती सेन यांचे तर, अभिनय कार्यशाळेसाठी दिग्दर्शक, अभिनेते अभिजित झुंजारराव यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. लावणी नृत्य कार्यशाळेचे सूत्रसंचलन नृत्यांगना, नृत्य दिग्दर्शिका कविता कोळी या करणार आहेत. यानिमित्ताने नर्तक, नृत्यदिग्दर्शक सचिन गजमल आणि नर्तिका, नृत्यदिग्दर्शिका, अभिनेत्री विजया कदम यांचे मार्गदर्शन यावेळी लाभणार आहे.
या सर्व कार्यशाळा विनामूल्य आहेत. १३ ते १७ मे यादरम्यान नेहरू सेंटरच्या विविध सभागृहात होणार आहेत‌. १७ मे ला रंगभूषा, वेशभूषा, वाद्य, प्रकाश योजना यांच्यासह शिबिरार्थींना घेऊन कार्यक्रमाचे सादरीकरण केले जाणार आहे. ज्या शिबिरार्थींना या कार्यशाळेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी नेहरू सेंटर, डॉ. ऍनी बेझंट रोड, वरळी, मुंबई - ४०००१८ किंवा समन्वयक प्रकाश पवार ९३२४८५७१८६ या क्रमांकावर संपर्क साधावा. येथे प्रवेशाच्या संदर्भाचे पत्रक मिळू शकेल‌. प्रथम संपर्क साधणाऱ्यांना प्रवेश दिला जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : जम्मू काश्मीर राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मंजूर

SCROLL FOR NEXT