मुंबई

खोपटे-कोप्रोली मार्गांवरील खड्डे बुजविण्यास सुरूवात

CD

खोपटे-कोप्रोली मार्गांवरील खड्डे बुजविण्यास सुरुवात
उरण, ता. २ (वार्ताहर) : येथील खोपटे-कोप्रोली मार्गावरील खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने बुजवण्यास सुरुवात केली आहे. त्‍यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
उरण तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या खोपटे- कोप्रोली मार्गावर आलकार्गो- ट्रान्सइंडिया गोदामासमोर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. एकाच ठिकाणी खड्डे पडलेले असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत होते. या मार्गाच्या दुरुस्तीसाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्याची दुरवस्था जैसे थे आहे. या खड्ड्यामुळे महामार्गावर कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे. जेएनपीए बंदराच्या अनुषंगाने उरण तालुक्यातील पश्चिम भागासह उरणच्या पूर्व भागातही सीएफएस आदी मोठमोठी गोदामे उभारण्यात आली आहेत. त्यामुळे या मार्गावरून दररोज हजारो अवजड वाहतूक सुरू असते. त्‍यामुळे खोपटा- कोप्रोली रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या दुचाकीस्वारांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. त्‍यामुळे परिसरातील नागरिकांसह वाहनचालकांनी या खड्ड्यांविरोधात आवाज उठवला होता. त्‍यामुळे अखेर याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने सदरील मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT