मुंबई

लोकसभा निवडणूक  रॅलीत  हेल्मेटचा विसर

CD

लोकसभा निवडणूक रॅलीत हेल्मेटचा विसर
सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. २ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचार फेऱ्या निघत आहेत. यामध्ये दुचाकी रॅलीत उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत; परंतु लोकसभा निवडणुकीतील रॅलीत हेल्मेटचा विसर पडल्याचे दिसून येत आहे.
 निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. प्रचारात कार्यकर्त्यांना रॅलीत येताना हेल्मेट आणावे, असे आवाहन करणे तर सोडाच ते उमेदवार स्वतःही विनाहेल्मेट जात आहेत. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकच्या माध्यमातून पोस्ट शेअर केल्या जात आहेत. मात्र कोणीही या पोस्टमध्ये विशेष टीप म्हणून हेल्मेटचा उल्लेखही आढळत नाही.
शहरातील सहा लोकसभा मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अर्ज भरत आहेत; तर काही उमेदवारांनी अर्ज भरून प्रचारही सुरू केला आहे. हा प्रचार सुरू असताना स्कूटर आणि कार रॅलीही निघत आहेत, मात्र कोणाकडूनही वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत.
---
निवडणूक रॅलीत कोणी विनाहेल्मेट किंवा इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असेल तर त्यांच्यावर वाहतूक नियमांनुसार कारवाई करण्यात येईल. ज्या तक्रारी आल्या आहेत, त्यांच्याकडून ई-चलन आकारण्यात आले आहे. 
- अनिल कुंभारे, सहपोलिस आयुक्त (वाहतूक)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT