मुंबई

ढवळे रुग्णालयात कर्करोग चिकित्सा प्रकल्प

CD

पालघर, ता. ११ (बातमीदार) : डॉ. एम. एल. मेमोरियल ट्रस्टच्या पालघर येथील ढवळे रुग्णालयात विनामूल्य कर्करोग चिकित्सा प्रकल्पाचे उद्‍घाटन शुक्रवारी (ता. १०) माजी राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ढवळे ट्रस्टचे विश्वस्त डॉ. कुमार ढवळे, संचालक डॉ. आनंद कापसे, डॉ. प्रशांत तांबोळी, नगराध्यक्ष उज्ज्वला काळे उपस्थित होत्या.

ढवळे रुग्णालयात पाच शस्त्रक्रिया विभाग नव्याने उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये कर्करोग चिकित्सा प्रकल्पाचे उद्‍घाटन राम नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. पालघरमध्ये कर्करोगावर उपचार करण्यासाठी कोणतेही रुग्णालय नाही. त्यामुळे उपचारासाठी मुंबईकडे जावे लागते, म्हणून ढवळे रुग्णालयाने कर्करोग विभाग सुरू केला.

लोकांमध्ये कर्करोगाविषयी योग्यप्रकारे जनजागृती न झाल्याने हा दुर्धर आजार बळावत असून त्यावर योग्य उपचार करण्यासाठी प्रथमच कर्करोग केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण भागात जाऊन शिबिरे राबवून कर्करोगाची प्राथमिक तपासणी केली जाणार आहे. यामध्ये कर्करोगाची गंभीर लक्षणे आढळल्यास त्या रुग्णाला तपासणीकरिता रुग्णालयात आणण्यात येईल, अशा रुग्णांच्या तपासण्या व औषध उपचार विनामूल्य करण्यात येणार आहेत, असे ढवळे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT