मुंबई

नापीक जमिनीमुळे लोकसभा निवडणुकीवर चाणजे ग्रामस्थांचा बहिष्कार

CD

नापीक जमिनीमुळे लोकसभा निवडणुकीवर चाणजे ग्रामस्थांचा बहिष्कार
२५० एकर क्षेत्र बाधित; १०० हून अधिक कुटुंबांना झळ
उरण, ता. ११ (बातमीदार) ः उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील चाणजे येथे सुमारे १०० हून अधिक शेतकऱ्यांच्या २५० एकर जमिनीवर खारफुटीचे अतिक्रमण झाले आहे. शिवाय सीआरझेडमध्ये जमिनी गेल्‍या आहेत. त्यामुळे चाणजे शेतकरी संघर्ष समितीच्‍या बैठकीत येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीवर एकमताने बहिष्कार टाकून निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या ५० ते ६० वर्षांपूर्वी चाणजे खाडीतील शेतजमिनीवर मोठ्या प्रमाणात भातशेती केली जात होती; परंतु कालांतराने बंदिस्त तुटत गेल्यामुळे समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणात शेतीत येऊ लागले. परिणामी येथील शेतजमिनीत खारफुटीचे अतिक्रमण होत गेले. अनेक वृक्षांचे, कांदळवनाचे शेतात अतिक्रमण झाले. अशा प्रकारे चाणजे येथील शेतजमीन समुद्राच्या पाण्याखाली आणि खारफुटीखाली गेल्‍या आहेत. चाणजे येथील शेतजमिनीचा इतिहास न पाहता आताच्या परिस्थितीचा विचार करून सरकारी यंत्रणा व न्‍यायालयाकडून भातशेतीची जमीन सीआरझेड व खारफुटीत दाखवण्यात आली आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना न्याय भेटत नाही, तोपर्यंत येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीवर चाणजे येथील बाधित शेतकऱ्यांद्वारे बहिष्कार टाकण्याचे ठरले आहे. या संदर्भात शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश म्हात्रे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, नुकतीच कोंढरीपाडा येथे सभा आयोजित केली होती. शेतकऱ्यांनी येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा एकमुखी निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रशासनासोबत बैठक पार पडली. मात्र कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अविनाश म्हात्रे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT