मुंबई

डाकिवली सरपंच, उपसरपंचाचा जिजाऊ संघटनेत प्रवेश

CD

वाडा, ता. ११ (बातमीदार) : सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच तालुक्यातील डाकिवली ग्रामपंचायतीच्या सरपंच दीपाली बंदरे आणि उपसरपंच नंदिनी गावळे, कार्यकर्ते नंदकुमार गावळे यांनी जिजाऊ संघटनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे डाकिवलीतील राजकीय समीकरण बदलेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
वाडा तालुक्यातील डाकिवली हे अडीच हजार लोकवस्ती असलेले गाव आहे. या ग्रामपंचायतीत शिंदे गटाने एक हाती सत्ता स्थापन केली होती. राज्यात सत्तेत शिवसेना असतानाही तालुक्यातील ठराविक ग्रामपंचायतींना निधी दिला जात असल्याचा आरोप आहे. या ग्रामपंचायतीला म्हणावा तसा विकास निधी न दिल्याने ग्रामपंचायतीत नाराजी होती. या नाराजीतून सरपंच दीपाली बंदरे, उपसरपंच नंदिनी गावळे आणि कार्यकर्ते नंदकुमार गावळे यांनी समर्थकासह जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष नीलेश सांबरे यांच्या उपस्थितीत जिजाऊ संघटनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे डाकिवली येथील राजकीय समीकरण बदलणार असून, जिजाऊ या गावात बाजी मारेल, असा विश्वास नंदकुमार गावळे यांनी बोलून दाखवला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT