मुंबई

मतदान कर्मचाऱ्यांचा बोटीतून प्रवास

CD

मतदान कर्मचाऱ्यांचा बोटीतून प्रवास
घारापुरी मतदान केंद्रावर यंत्रांसह रवाना

पनवेल, ता. १२ (बातमीदार) : घारापुरी या समुद्रातील ऐतिहासिक ठिकाणच्या एलोरा गुंफा पाहण्यासाठी मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावरून बोटीने प्रवास करून पर्यटक पोहोचतात. आज मात्र मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी कर्मचाऱ्यांनी यंत्रासह हा प्रवास करीत घारापुरी गाठली.
मावळ लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या (ता. १३) सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून विधानसभा मतदारसंघनिहाय निश्चित केलेल्या ठिकाणांहून आज सकाळी आठ वाजल्यापासून मतदान साहित्य वितरण प्रक्रियेला सुरुवात झाली. मतदानासाठी आवश्यक असणारे बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्र मतदान पथकनिहाय ताब्यात देण्यात आले. तसेच विविध लिफाफे, स्टेशनरी, ओआरएससह प्रथमोपचार पेटी, दिशादर्शक फलक, मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक साहित्य, विविध अहवालाच्या प्रती आणि मार्गदर्शक सूचना साहित्य या वेळी पथकाकडे सुपूर्द करण्यात आले. या पथकांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी वाहतूक व्यवस्थाही करण्यात आली होती. या लोकसभा क्षेत्रात उरण विधानसभा मतदारसंघ येतो. उरण मतदारसंघातील मतदान केंद्रांसाठी मतदान साहित्याचे वितरण जासई येथील डी. बी. पाटील मंगल कार्यालयातून करण्यात आले. यामधील ५८ क्रमांकाचे घारापुरी मतदान केंद्र आहे. अरबी समुद्रातील बेटावरील हे मतदान केंद्र असून तेथे ३८९ पुरुष आणि ४२० महिला असे एकूण ८०९ मतदार वास्तव्य करतात. या मतदान केंद्रासाठी स्वतंत्र क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. एक मतदान केंद्राध्यक्ष, दोन मतदान अधिकारी, एक मतदान सहायक यांनी आज उरणमधून मतदानाचे साहित्य ताब्यात घेतले आणि सोबत पोलिस बंदोबस्त घेऊन मतदान कर्मचाऱ्यांचे हे पथक आधी जीप वाहनाने जेएनपीटी बंदरापर्यंत आले आणि तेथून थेट बोटीने मतदान साहित्य घेऊन घारापुरीतील केंद्रावर पोहोचले.
...
अधिकाऱ्यांचे लक्ष
मतदान कर्मचाऱ्यांनी घारापुरी मतदान केंद्रावर साहित्य पोहोचविले. उरण विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन कासार यांचे सर्व घडामोडींवर लक्ष होते. देशाच्या प्रत्येक पात्र मतदाराला लोकशाहीच्या या महाउत्सवात सहभागी होता यावे, यासाठी या कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT