मुंबई

समोशात आढळला खिळा

CD

समोशात आढळला खिळा

वाशी, ता. १३ (वार्ताहर) : वाशीतील एका प्रसिद्ध खाद्य दुकानातील समोशात खिळा आढळल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी (ता. ११) सायंकाळी प्रतीक सावंत हे आपल्या मित्रांसोबत नाश्‍ता करण्यासाठी या दुकानात गेले होते. यावेळी त्यांनी घेतलेल्या समोशात २ इंची खिळा आढळून आला.


वाशी सेक्टर ९ येथील न्यू संतोष स्वीट अँड स्नॅक्स या दुकानात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणात उपस्थितांपैकी एकाने या घटनेचा व्हिडीओ काढत तो व्हायरल केला. याबाबत दुकान मालकाला जाब विचारला असता दुकान मालकाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने प्रतीक सावंत आणि त्यांच्या मित्रांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी केली असता या दुकानाच्या किचनमध्ये उंदरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला; तर बटाटे उकळण्यासाठी वापरत असलेला स्टोव्ह चक्क शौचालयात ठेवल्याचे पोलिसांना आढळून आले. हा सगळा प्रकार लक्षात घेत प्रतीक आणि त्यांच्या मित्रांनी वाशी पोलिस चौकीत याबाबत तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, स्थानिकांनी दुकानदारांच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त करत अन्न व औषध प्रशासनाच्या कारभारावरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT