मुंबई

ठाणे पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन

CD

ठाणे, ता. १४ (वार्ताहर) : लोकसभा निवडणूक शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडण्यासाठी ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानुसार पोलिसांनी पाच परिमंडळाचे मनुष्यबळ, वाहतूक पोलिसांचे ३१५ अधिकारी आणि एक हजार २३६ अंमलदारांचे पथक तयार केले या पथकाने ऑल आऊट ऑपरेशन सुरू केले असून तब्बल १९ घातक हत्यारे हस्तगत केली आहेत. तर दारूप्रकरणी ४६ जणांवर कारवाई केली आहे. आतापर्यंत ६०५ सराईत गुन्हेगारांची झाडाझडती पोलिसांनी घेऊन २० हद्दपार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
ठाणे पोलिसांनी ऑल आऊट ऑपरेशनमध्ये शनिवारी (ता. ११) रात्री ११.३० ते रविवार (ता. १२) पहाटे ३ वाजेपर्यंत केलेल्या कारवाईत एक रिव्हॉल्वर, गावठी कट्टे तीन, कोयते चार, सुरे १० आणि एक इतर अशी १९ हत्यारे हस्तगत केली आहेत. याप्रकरणी १९ गुन्हे दाखल करत १४ जणांना अटक करण्यात आली आहे. अवैध दारूप्रकरणी ४६ आरोपींवर कारवाई करत दोन लाख ६२ हजारांची गावठी दारू जप्त केली. कोटपाअंतर्गत १३६ जणांवर कारवाई केली. पोलिसांनी आयुक्तालयाच्या हद्दीत हॉटेल १८८, लॉज १८२, बियर बार १००, डान्स बार ५२ आणि अन्य आस्थापनांची झाडाझडती घेतली आहे. ऑल आऊट ऑपरेशनअंतर्गत पोलिसांनी ६०५ सराईत गुन्हेगारांची झाडझडती घेतली आहे. यात रेकॉर्डवरील हिस्ट्रीशिटर-२६७, तडीपार-१६६, गुंड-१७२ अशा ६०५ सराईत गुन्हेगारांची तपासणी केली. त्यात २० तडीपार गुंडांना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कारवाई दरम्यान अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या ४० जणांवर कारवाई केली.

वाहतूक पोलिसांची कारवाई
वाहतूक पोलिसांनी एक हजार ७९८ वाहनांची तपासणी केली. यात ७९१ वाहनांवर दंडात्मक कारवाई करून सहा लाख ८५ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

मुद्देमाल हस्तगत
ठाणे पोलिसांच्या ऑल आऊट ऑपरेशनमध्ये पोलिस पथकाने ७२ हजार ४५० रुपयांची एकूण अवैध शस्त्र, २ लाख ६२ हजार १० रुपयांची अवैध दारू असा ३ लाख ३४ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT