मुंबई

अलाहाबादमधील सिद्दिकी कुटुंबावर दु:खाचा डोंगर

CD

घाटकोपर, ता. १४ (बातमीदार) : घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेमुळे अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कामराजनगर परिसरात राहणारे मोहंमद अक्रम सिद्दिकी (वय ४८) यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. रिक्षाचालक असलेले सिद्दिकी यांची पत्नी शामिना आणि मुलगी शबनम हे अलाहाबादमध्ये राहतात, तर सिद्दिकी हे आपल्या तीन भावांसह भाड्याने येथे राहतात. त्यांच्या कमाईवरच त्यांचे कुटुंब अवलंबून होते. सिद्दिकी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंब उद्‌ध्वस्त झाले आहे.

सिद्दिकी दिवसभरात एकदा तरी आपल्या पत्नी आणि मुलीशी फोनवरून बोलून त्यांची विचारपूस करत असत. दुर्घटनेची बातमी कानावर आली; पण त्यात सिद्दिकी असतील असे त्याच्या भावांना कल्पनाही नव्‍हती. मात्र, त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होत नव्‍हता. त्यानंतर त्यांनी शोधाशोध सुरू केली. त्यांनी राजावाडी रुग्णालय गाठले. तेथे मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर त्यांनी गावी त्यांच्या पत्नी आणि मुलीला कळवताच त्यांनी हंबरडा फोडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT