मुंबई

तत्कालीन पोलिस आयुक्तांकडून परवानगी

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : घाटकोपरमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेले होर्डिंग हे लोहमार्ग पोलिसांच्या मालकीच्या जागेवर लागले होते. आठवडाभरापूर्वी पालिकेने जाहिरातदाराविरोधात तक्रार केली होती. हे होर्डिंग हटवण्यापूर्वीच हा अपघात झाल्याचे स्पष्टीकरण लोहमार्ग पोलिसांनी दिले आहे. तत्कालीन लोहमार्ग पोलिस आयुक्त कैसर खालिद यांच्या आदेशावरून दिली गेली होती, अशी माहिती देण्यात आली आहे.
लोहमार्ग पोलिस आयुक्तालयाच्या कल्याण निधी संस्थेमार्फत बीपीसीएल पेट्रोल पंप चालवण्यात येतो. हा पेट्रोल पंप १० डिसेंबर २०२१ रोजी पोलिसांच्या मालकीच्या जागेत सुरू केला. या पेट्रोल पंपाच्या शेजारी तत्कालीन ‘इगो मीडिया’ या जाहिरात कंपनीला १० वर्षांच्या भाडेकरारावर हे होर्डिंग उभारण्याची परवागी दिली होती. सोमवारी वादळी वाऱ्यामुळे हे महाकाय होर्डिंग पेट्रोलपंपावर पडून मोठी दुर्घटना घडली.

कारवाईपूर्वीच अपघात
मुंबई महापालिकेकडून मागील आठवड्यात हे होर्डिंग दिसावे, यासाठी समोरच्या रस्त्याकडेची झाडे सुकविल्याप्रकरणी महापालिकेकडे दाखल झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने जाहिरातदारास होर्डिंग काढून टाकण्यासंबंधी कारवाई करण्यासाठीचे पत्र मिळाले होते. कारवाई करण्यापूर्वीच हा अपघात झाला. मात्र, महापालिकेकडून दंड लावण्याच्या नोटिशीच्या बातम्यांत काही तथ्य नसल्याचा खुलासा लोहमार्ग पोलिसांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात केला आहे.

कैसर खालिद अडचणीत?
लोहमार्ग पोलिसांनी केलेल्या खुलाशामुळे तत्कालीन पोलिस आयुक्त कैसर खालिद यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तत्कालीन पोलिस आयुक्त कैसर खालिद यांची लोहमार्ग येथून वर्षभरापूर्वी बदली झाली आहे. सध्या त्यांची नेमणूक संरक्षण नागरी हक्क (पीसीआर) विभागाचे अतिरिक्त महासंचालक (एडीजी), महाराष्ट्र पोलिस म्हणून झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT