मुंबई

घाटकोपरमध्ये आज नरेंद्र मोदींचा रोड शो

CD

घाटकोपरमध्ये आज नरेंद्र मोदींचा रोड शो
रस्ते वाहतुकीत बदल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ ः लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे बुधवारी (ता. १५) मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्यासाठी मोदी घाटकोपर येथे अडीच किलोमीटरचा रोड शो करणार आहेत. रात्री ८ वाजता या रोड शोला सुरुवात होणार असून त्यासाठी वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.
लालबहाद्दूर शास्त्री मार्गावरील श्रेयस सिनेमापासून गांधी मार्केटपर्यंत मोदींचा रोड शो होईल. मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा उभे आहेत. या ठिकाणी २० मे रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर मुंबईतल्या इतर पाच मतदासंघांसाठीही याच दिवशी मतदान पार पडणार आहे. दिंडोरी इथे प्रचार सभेला संबोधित केल्यानंतर कल्याणमध्येही मोदींची सभा पार पडणार आहे. त्यानंतर रात्री घाटकोपरला ते रोड शोसाठी येतील.

रात्री १० पर्यंत प्रवेश बंदी
मुंबई वाहतूक पोलिसांच्या आदेशानुसार, बुधवारी (ता. १५) दुपारी २ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत गांधीनगर चौकापासून नौपाडा चौकापर्यंत लालबहादूर शास्त्री रोडवर एकाही वाहनाला प्रवेश देण्यात येणार नाही. तसेच मेघराज चौक ते आर. बी. कदम चौकापर्यंत माहुल-घाटकोपर रस्त्यावरही वाहनांसाठी प्रवेश बंदी असेल. तसेच अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवरील घाटकोपर चौक ते साकीनाका चौक, गुलाटी पेट्रोल पंप चौक ते हिरानंदानी कैलास कॉम्प्लेक्स रोड त्याचबरोबर गोळीबार मैदान आणि घाटकोपर मेट्रो स्‍थानक (पश्चिम) सर्वोदय चौकापर्यंत रस्ता बंद असेल.

असे असतील पर्यायी मार्ग
पर्यायी मार्ग म्हणून प्रवाशांना पूर्व द्रुतगती महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग, अंधेरी-कुर्ला रोड, साकी विहार रोड, एमआयडसी सेंट्रल रोड, चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोड, सायन-वांद्रे लिंक रोड आणि जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड या मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT