मुंबई

अडीच हजार मेट्रिक टन वजनाचा गर्डरचे आज लॉंचिग

CD

अडीच हजार मेट्रिक टन वजनाच्या गर्डरचे आज लॉँचिंग
दोन मार्ग जोडणार, पाऊस आणि वादळानंतर पालिका सावध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : कोस्टल रोड प्रकल्पातील सर्वांत आव्हानात्मक टप्पा म्हणजे वांद्रे वरळी सी लिंकला जोडणीचा आहे. वांद्रे- वरळी सी लिंक जोडणीतील दुसरा टप्पा म्हणजे दोन हजार ४०० मेट्रिक टन वजनाचा बो-स्ट्रिंग आर्च गर्डर बुधवारी (ता. १५) पहाटे पाच ते सात या वेळेत बसवण्यात येणार आहे. वादळी वारा आणि पावसाचा अंदाज घेऊन हा महाकाय गर्डर बसविण्यात येणार आहे.
खुल्या समुद्रात भरती- ओहोटीचे आव्हान स्वीकारत दुसरा गर्डर बसवण्यात येणार असून हवामानाचा अंदाज घेऊन मिशन फत्ते करणार असल्याचा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त केला आहे. दरम्यान, सोमवारी वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा मुंबईला बसल्यामुळे समुद्राला मोठ्या भरतीचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. त्यामुळेच बुधवारी पहाटे समुद्रात अभियांत्रिकी आविष्कार घडणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रियदर्शनी पार्क ते वरळीदरम्यान कोस्टल रोडचे काम सुरू असून आता ८९ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पातील दुसरा आव्हानात्मक टप्पा हा वांद्रे- वरळी सी लिंक जोडणी आहे. या आव्हानात्मक पहिल्या टप्प्यातील वांद्रे- वरळी सी लिंक जोडणीतील पहिला दोन हजार मेट्रिक टन वजनाचा बो- स्ट्रिंग आर्च गर्डर २५ रोजी पहाटे दोन ते ३.२५ या सव्वा तासामध्ये यशस्वीपणे बसवण्यात आला. तर आता बुधवारी पहाटे पाच ते सात या वेळेत बसवण्यात येणार आहे.

शुक्रवारी पहाटे सव्वा तासामध्ये बो- स्ट्रिंग आर्च गर्डर यशस्वीपणे बसवण्यात आल्यानंतर आता दुसरा बो- स्ट्रिंग आर्च गर्डर बुधवारी (ता. १५) पहाटे बसवण्यात येणार आहे. त्यामुळे दुसरा महाकाय गर्डर लॉँच केल्यानंतर पुढील काही दिवसांत मरिन ड्राईव्ह ते वांद्रे सी लिंक प्रवास करता येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT