मुंबई

‘बसवंत गार्डन'' तर्फे बसवंत कृषी पर्यटन महोत्सव

CD

‘बसवंत गार्डन’तर्फे बसवंत कृषी पर्यटन महोत्सव
पिंपळगाव (ब.) येथे आयोजन, १५ ते २० मेदरम्यान विविध उपक्रम होणार साजरे

नाशिक : ग्रीनझोन अ‍ॅग्रोकेम प्रा. लि. संचालित ‘बसवंत गार्डन’तर्फे आनंदी जीवनशैलीच्या दृष्टिकोनातून कृषी संस्कृतीचे महत्त्व सांगणारा ‘बसवंत कृषी पर्यटन महोत्सव’ आयोजित केला आहे. हा महोत्सव १५ ते २० मे रोजी होणार आहे. १६ मे हा ‘जागतिक कृषी पर्यटन दिन’ तर २० मे हा ‘जागतिक मधमाशी दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने विविध उपक्रम साजरे होणार आहेत.
बसवंत गार्डन, मुखेड रोड, पिंपळगाव बसवंत (ता. निफाड, जि. नाशिक) येथे हा महोत्सव होणार आहे.
‘कृषी पर्यटन आणि बदलती जीवनशैली’ या विषयावर विशेष चर्चासत्र आहे. या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कृषी पर्यटन उद्योजकांचा विशेष पुरस्काराचा गौरव केला जाणार आहे. त्याचबरोबर ‘बसवंत आंबा महोत्सव’ही आयोजित केला आहे. यामध्ये हापूस, केशर आणि इतर आंब्यांच्या जातींचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. उत्कृष्ट आंबा उत्पादकांमध्ये स्पर्धा आयोजित करून त्यांना मिलांज महाराजा (हापूस), मिलांज महाराजा (केशर) अशी बक्षिसांबरोबरच इतर ११ स्वतंत्र बक्षिसेही दिली जाणार आहेत.

या महोत्सवाच्या दरम्यान ‘बसवंत मधमाशी उद्यान आणि प्रशिक्षण केंद्र’ त्याचप्रमाणे ‘बसवंत गार्डन’मधील ग्रामसंस्कृती विभाग, आदर्श गाव- सेवरगाव, गोमाता संस्कृती, बैल संस्कृती, फळे- भाजीपाला- मध प्रक्रिया युनिट, बनी व्हिलेज, अ‍ॅक्वामीन-अ‍ॅक्वा टुरिझम, ग्रेपसिटी- ग्रेप टुरिझम तसेच गेम झोनला भेट देण्याची संधी मिळणार आहे.

भारतातील पहिल्या आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा ‘बसवंत अ‍ॅपी टुरिझम सेंटर’मध्ये तसेच ‘बसवंत गार्डन’मध्ये विविध सृष्टिकेंद्री उपक्रम आयोजित करून, समाजामध्ये कृषी पर्यटनाबरोबरच मधमाशी पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘ग्रीनझोन अ‍ॅग्रोकेम प्रा. लि.’ सदैव प्रयत्नशील असते. पर्यावरण संरक्षण आणि त्या अनुषंगाने व्यापक लोकप्रबोधन साध्य करणारे आणि सतत कार्यशील असणारे एक ‘हरित व्यासपीठ’ निर्माण करणारे ‘बसवंत गार्डन’ आजवर राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरले आहे, असेही आयोजकांनी नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT