Mumbai News sakal
मुंबई

Mumbai News: वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली लाखोंची फसवणूक, वाचा काय आहे प्रकरण

CD

Mira Bhindar: वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली मिरा रोड येथे राहणाऱ्या एका व्यक्तीची पाच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. मात्र काशीगाव पोलिसांनी तातडीने पावले उचलून फसवणूक झालेली संपूर्ण रक्कम तक्रारदाराला परत मिळवून दिली आहे.

काशीगाव पोलिस ठाण्याच्या परिसरात राहणारे श्रीहरी पडवगौडू यांना ऑनलाईन व्हिडीओ लाईक करण्याचे टास्क, ऑनलाईन हॉटेल व चित्रपट रेटिंग यांना लाईक आदी कामे करणे अथवा गुंतवणूक करणे यातून अधिक नफा मिळविण्याचे प्रलोभन दाखवण्यात आले.

त्यांच्याकडून तब्बल पाच लाख १६ हजार ७८५ रुपये ऑनलाईन उकळण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पडवगौडू यांनी काशीगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुलकुमार पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी झालेल्या व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करून घेतली. त्यात तक्रारदाराची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात वळती झाल्याचे आढळून आले.

त्यामुळे संबंधित बँकांशी संपर्क साधून ही रक्कम गोठविण्याबाबत त्यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला. ही रक्कम परत मिळविण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे पाठपुरावा केला व फसवणूक झालेली संपूर्ण रक्कम श्रीहरी पडवगौडू यांच्या मूळ बँक खात्यावर हस्तांतर करून घेण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajan Teli: राजन तेली आमचेच! दिशाभूल झालेले अनेक जण परतणार; उद्धव ठाकरेंचं सूचक विधान

Direct Tax: मोदी सरकारच्या दहा वर्षांत प्रत्यक्ष कर संकलन 182 टक्क्यांनी वाढले; महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर, गुजरात कुठे?

Ola Electric : ओला इलेक्ट्रिककडून नवीन बॉस ऑफर्सची घोषणा, एस१ पोर्टफोलिओवर जवळपास २०,००० रूपयांची सूट आणि २५,००० रूपयांचे अतिरिक्‍त फायदे

IND vs NZ 1st Test : Virat Kohli चा भीमपराक्रम! गाजवलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट अन् कसोटीत विक्रमी झेप

Shiv Sena: शहाजीबापुंच्या विरोधात ठाकरेंची मोठी खेळी, अजित पवारांच्या बड्या नेत्यानं हाती घेतली मशाल! उद्धव ठाकरे, म्हणाले...

SCROLL FOR NEXT