Crime News:  बोगस पासपोर्ट असणाऱ्या त्या  बांगलादेशींना झाला आठ वर्षांचा कारावास!
Crime News:  sakal
मुंबई

Crime News: बोगस पासपोर्ट असणाऱ्या त्या बांगलादेशींना झाला आठ वर्षांचा कारावास!

CD

Andheri News: पुण्यासह नालासोपारा आणि विरार येथून अटक केलेल्या २० बांगलादेशी नागरिकांना किल्ला न्यायालयाने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या नागरिकांना आठ महिन्यांच्या कारावासासह चार हजार रुपयांचा दंड आणि दंडाची रक्कम न भरल्यास आणखीन १६ दिवसांचा कारावास भोगावा लागणार आहे. या शिक्षेनंतर त्यांना बांगलादेशात पाठविले जाईल, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निनाद सावंत यांनी सांगितले.


१९ ऑक्टोबर २०२३ रोजी बोरिवली पोलिसांच्या एका विशेष पथकाने आकाश स्विट्ससमोरून सुमन सदार, ओमर मौल्ला आणि सलमान खान या तिघांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत ते तिघेही बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. त्यांच्याकडे पोलिसांना बोगस आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्टसह इतर भारतीय दस्तऐवज सापडले होते.

चौकशीदरम्यान सुमन आणि आयुब हे दोघेही एजंट म्हणून काम करत असून भारतात वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांना ते दोघेही बोगस दस्तावेज बनवून देत होते. या दस्तऐवजाच्या मदतीने त्यांनी अनेकांना बोगस भारतीय पासपोर्ट मिळवून दिले होते.


पोलिसांनी नालासोपारा, विरार आणि पुण्यातील त्यांच्या इतर १७ बांगलादेशी सहकाऱ्यांना अटक केली होती. त्यात अतिकुल मुल्ला, मुस्ताकअली तरबदार, फिरोज मोल्ला, रहिम मंडल, रॉनी शेख, इनामुलकमल सरदार, मसुद गाझी, रिपो ढाली, मोनीरुल मुल्ला, आरिफ बिश्‍वास, मुमबिल्ला मंडल, दिलावर गाझी आणि रब्बी मंडल यांचा समावेश होता. ते सर्वजण बांगलादेशातील बेरोजगारी आणि उपासमारीला कंटाळून भारतात नोकरीसाठी आले होते.

या आरोपींविरुद्ध नंतर किल्ला न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. या खटल्याची अलीकडेच सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्या. झनवट यांनी २० बांगलादेशी नागरिकांना दोषी ठरवून त्यांना आठ महिन्यांच्या कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

अतिरिक्त पोलिस आयुक्त राजीव जैन, पोलिस उपायुक्त आनंद भोईटे, सहायक पोलिस आयुक्त सुनील जायभाये, वरिष्ठ पोलिस निरीक्षक निनाद सावंत यांच्या पथकातील प्रदीप काळे, साळुंखे, प्रमोद निंबाळकर, कल्याण पाटील, शेख, राणे, सावर्डेकर, केसरे, रेवाळे, गर्जे यांनी केली तर पोलिस हवालदार प्रमोद जाधव, कणसे यांनी न्यायालयीन कामात महत्त्वाची कामगिरी बजावली.

बोगस दस्‍तऐवजाच्या साहाय्याने मिळवले पासपोर्ट


बांगलादेशातून अवैध मार्गाने भारतात प्रवेश केल्यानंतर ते सर्वजण काही महिने कोलकता येथे राहत होते. त्यानंतर ते सर्वजण पुणे, नालासोपारा आणि विरार येथे राहण्यासाठी गेले. तिथेच त्यांनी भारतीय नागरिक असल्याचे बोगस दस्तऐवज बनविले होते. या दस्तऐवजाच्या मदतीने त्यांनी भारतीय पासपोर्ट मिळविले होते. या पासपोर्टवर व्हिसा मिळवून त्यातील काही बांगलादेशी नागरिक आखाती देशात नोकरीसाठी जाणार होते. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Worli Hit And Run Case: वरळीत 'हिट अँड रन'प्रकरणातील आरोपीने बारमध्ये पिलं इतक्या हजारांचं मद्य, बिलाचा फोटो व्हायरल

ICC Champions Trophy Ind vs Pak : चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठी अपडेट, भारत पाकिस्तानला देणार धक्का?

Maharashtra Live News Updates : आषाढीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलाचे व्हीआयपी दर्शन बंद

Dharmaveer 2 : "ज्याच्या घरातली स्त्री दुःखी, त्याची बरबादी नक्की!" ; 'धर्मवीर २' चा जबरदस्त टीझर प्रेक्षकांच्या भेटीस

Sunita Williams Space Mission: सुनीता विल्यम्सच्या परतीबद्दल नासाने दिली खुशखबर! फक्त एवढ्या दिवसात पृथ्वीवर परतणार अंतराळवीर

SCROLL FOR NEXT