मुंबई

महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठ इमारत रखडली

CD

कौशल्‍य विद्यापीठ कागदावरच
भूमिपूजनाच्या चौदा महिन्यानंतरही काम रखडले; आयटीआयच्या विद्यार्थ्यांचे धोकादायक इमारतीत प्रशिक्षण

वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. २९ ः शहरात अनेक शैक्षणिक संस्थांचे जाळे पसरले असून यात महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाचे भर पडणार होती. पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या जागेवर हे कौशल्‍य विद्यापीठ साकारत असून त्‍याचे भूमिपूजन सव्वा वर्षापूर्वी मोठा गाजावाजा करीत करण्यात आले. मात्र त्‍यानंतर काम सुरूच न झाल्‍याने सध्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांना धोकादायक इमारतीत प्रशिक्षण घ्यावे लागत आहे.
मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्‍या पनवेलचा झपाट्याने विकास झाला आहे. नागरिकरण तसेच औद्योगीकरण वाढत असून नवनवीन आंतरराष्ट्रीय प्रकल्प येऊ घातले आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामही वेगाने सुरू आहे. त्यामुळे पनवेल जगाच्या नकाशावर पोहोचले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्थांचे जाळे पसरले आहे. खारघरमध्ये १७ कॉलेज आणि ३० पेक्षा जास्त शाळा आहेत. त्यामध्ये भारतीय विद्यापीठ, येरळा मेडिकल, जी.डी. पोळ, सरस्वती कॉलेज, आयटीएम, एस. एस. पाटील या महाविद्यालयांचा समावेश आहे. कामोठे वसाहतीत एमजीएम विद्यापीठ आहे. त्याचबरोबर के एल ई एज्युकेशन कॅम्पस आहे. नवीन पनवेलमध्ये महात्मा एज्युकेशन सोसायटीचे पिल्लाई कॉलेज आहे. खांदा वसाहतीत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सीकेटी महाविद्यालय २५ वर्षापासून आहे. या व्यतिरिक्त अनेक शिक्षण संस्था या भागांमध्ये आहेत. शिक्षणाचे माहेरघर म्हणून पनवेलची नवी ओळख निर्माण झाली आहे. त्यातच आता महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठही पनवेलला आले आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कॅम्पस परिसरात विद्यापीठाची इमारत उभारण्यात येणार आहे.
सुमारे १७ एकर जागेवर विद्यापीठ साकारण्यात येत आहे. यात पाच वेगवेगळ्या विभागाची कार्यालये असतील. सुमारे १५ लाख चौरस फुटाचे बांधकाम करून परिसर विकसित केला जाणार आहे. कामाचे भूमिपूजन २७ मार्च २०२३ रोजी करण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. त्याला जवळपास १४ महिने उलटले आहेत. परंतु त्यानंतर बांधकामासाठी फारशा हालचाली झालेल्‍या दिसत नाहीत. मग भूमिपूजनाची घाई का केली, असा प्रश्‍न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.

हे अभ्यासक्रम प्रस्तावित!
विद्यापीठातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, मशिन लर्निंग, बिझनेस इंटेलिजन्स आणि इनोव्हेशन, बॅचलर ऑफ बिझनेस, ऍडमिनिस्ट्रेशन, न्यू व्हेंचर मॅनेजमेंटमधील टेक्नॉलॉजी डोमेनमधील अभ्यासक्रमाचा समावेश आहे.

आयटीआयचाही पुनर्विकास रखडला
पनवेल आयटीआयच्या इमारतीची दुरवस्था झाली असून इमारती मोडकळीस आली आहेत. जीव मुठीत धरून विद्यार्थी औद्योगिक प्रशिक्षण घेतात. येथील वसतिगृहाची अवस्थाही अत्यंत बिकट आहे. कौशल्य विद्यापीठाबरोबरच पनवेल आयटीआयच्या इमारतींचाही पुनर्विकास केला जाणार आहे. परंतु सध्या तरी तो कागदावर आहे.

पनवेल औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या जागेवर भव्य दिव्य कौशल्‍य विद्यापीठ साकारण्यात येत आहे. हा जवळपास एक हजार कोटींचा प्रकल्प आहे. महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठ भवनचा संकल्प आराखडा तांत्रिक मंजुरीसाठी संबंधित विभागाकडे पाठवण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर अधिवेशनामध्ये निधी मंजूर होईल आणि त्यानंतर निविदा प्रक्रिया करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल.
- विजय टिकोळे, उपप्राचार्य, आयटीआय पनवेल

पनवेल ः नियोजित इमारतीचा आराखडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : जम्मू काश्मीर राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मंजूर

SCROLL FOR NEXT