मुंबई

शेती कामात मोकाट जनावरांचा अडथळा

CD

भिवंडी, ता. २९ (बातमीदार) : पावसाळा तोंडावर आल्याने शेतकऱ्यांनी शेतीसाठी लागणाऱ्या सामानाची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे; तर दुसरीकडे बळीराजा मोकाट जनावरांमुळे चिंतेत सापडला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीणमध्ये शेतकऱ्यांची खरिप हंगामातील लगबग सुरू झाली आहे. यासाठी बळीराजाकडून शेतीपूर्व कामांना वेग आल्याचे दिसून येत आहे. अशातच अनेक ठिकाणी शेतांमध्ये फिरणाऱ्या मोकाट जनावरांची चिंता शेतकऱ्यांना भेडसावू लागली आहे. या जनावरांना मालक नसल्याने तक्रार तरी कुणाकडे करायची, असा प्रश्न भेडसावत आहे.

सध्या शेतकरी खरिप हंगामाच्या तयारीसाठी शेतात भाताच्या बियाण्याची पेरणी करतात; मात्र बेवारस जनावरांच्या भटकंतीने या बियाण्यांची नासधूस होते. तसेच पेरणीनंतर लावणीसाठीच्या भातरोपांचीही नासाडी जनावरे करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेकदा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. त्यातच मान्सूनमधील पावसाची अनियमितता आणि लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल होत असतात. दरम्यान मान्सून काही दिवसांवर येऊन ठेपल्याने गावागावातील मोकाट जनावरांबाबत संबंधित कृषी अधिकारी यांनी यावर उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांना होणाऱ्या अधिकच्या परिश्रमासह आर्थिक नुकसानीतून मुक्तत्ता द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

ग्रामीण पातळीवर मोकाट जनावरांना गोशाळेत पाठवण्याची सुरुवात ग्रामपंचायत प्रशासनाकडून होते. त्यासाठी ग्रापंचायत प्रशासनाने ग्रामसभेत ठराव मंजूर करून मोकाट जनावरांना गोशाळेत पाठवण्यासाठीचे लेखी निवेदन बजरंग दलाला द्यावे. त्यानुसार मोकाट जनावरांना सुखरूप गोशाळेत पाठवले जाईल.
- संदीप भगत, प्रांत संयोजक, बजरंग दल, कोकण विभाग

मोकाट जनावरांना गोशाळेत पाठवण्याबाबत काही कल्पना नव्हती; परंतु आगामी मासिक मीटिंगमध्ये मोकाट जनावरांची गोशाळेत रवानगी करण्याबाबतचा विषय घेतला जाईल. त्यानंतर ग्रामसभेत सदर ठराव मंजूर करून बजरंग दलाला तसे लेखी निवेदन दिले जाईल.
- यशोदा मढवी, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत जुनांदुरखी - टेंभवली

अनेक वर्षांपासून मोकाट जनावरांमुळे खरिप हंगामात भातपिकाचे; तर रब्बी हंगामात वाल, तूर, मूग, हरभरा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे मोकाट जनावरांची गोशाळेत रवानगी करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवावे.
- शिवाजी राऊत, शेतकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : जम्मू काश्मीर राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मंजूर

SCROLL FOR NEXT