मुंबई

नालेसफाईत निष्काळजीपणा केल्यास कारवाई

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : मोठ्या व छोट्या नाल्‍यांमधील गाळ काढण्‍याचे काम अंतिम टप्‍प्‍यात आले आहे. काही नाल्‍यांमधील गाळ काढण्‍याचे काम पूर्ण झाले असले, तरी काही ठिकाणी त्रुटी निदर्शनास आल्‍याने निष्‍काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली आहे. वेगवेगळ्या कंत्राटदारांना मिळून एकूण ५४ लाख ६८ हजार रुपयांची दंडआकारणी करण्‍यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
पावसाळापूर्व कामांचा भाग म्‍हणून, मुंबई महानगरातील नद्या आणि नाल्‍यांमधील गाळ काढण्‍यात येत आहे. पालिकेचे वरिष्ठ अधिकारी शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांतील नाल्‍यांतून गाळ काढण्‍याच्‍या कामांची पाहणी व तपासणी प्रत्‍यक्ष भेट देऊन करत आहेत. तसेच, नालेसफाईची कामे सुयोग्‍य पद्धतीने करण्‍याचे निर्देश पालिका प्रशासनाने दिले आहेत. थर्माकॉल, प्लास्टिक पिशव्या, फर्निचर, रबर, रॕपर्स असा विविध प्रकारच्या तरंगत्या वस्तूंचा (फ्लोटिंग मटेरिअल) समावेश आहे. प्लास्टिकवर बंदी असली, तरी नागरिक प्लास्टिक कचरा नाल्यात टाकत असल्याने सांडपाण्याचे वहन, निचरा होण्यास अडथळे निर्माण होतात. भरतीच्या काळात नाल्यातून तरंगणारा कचरा आणि गाळ काढण्याच्या कामात अनेक अडथळे निर्माण होत असतात, असे पालिकेने म्हटले आहे.
मोठ्या व छोट्या नाल्‍यांमधील गाळ काढण्‍याचे काम अंतिम टप्‍प्‍यात आले आहे. तथापि, काही नाल्‍यांमधील गाळ काढण्‍याचे काम पूर्ण झाले असले, तरी भरतीसोबत तरंगता कचरा जमा झाल्‍यामुळे नालेसफाई वारंवार करावी लागत आहे. नाल्‍यातून गाळ काढण्‍याच्‍या कामात निष्‍काळजीपणा, त्रुटी निदर्शनास आल्‍यावर निष्‍काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली असून वेगवेगळ्या कंत्राटदारांना मिळून एकूण ५४ लाख ६८ हजार रुपयांची दंडआकारणी करण्‍यात आली आहे.
…...
प्रायोगिक तत्त्वावर नाल्यांवर जाळ्या
नाल्यांमध्ये येणाऱ्या कचऱ्यास प्रतिरोध करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन छोट्या नाल्यांच्या ठिकाणी जाळ्या लावता येतील का किंवा ते नाले बंदिस्त करता येतील का, तसेच मोठ्या नाल्यांच्या ठिकाणी स्क्रिनिंग किंवा नेटचा पर्याय वापरता येईल का, याबाबतची चाचपणी पालिका करीत आहे. प्रायोगिक तत्त्वावर काही ठिकाणी जाळी बसविण्यात आली असल्याची माहिती पालिकेने दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT