मुंबई

विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

CD

कासा, ता. २ (बातमीदार) : गेल्या काही दिवसांपासून कासा, चारोटी परिसरातील वीजपुरवठा नेहमी खंडित होत आहे. त्यामुळे विद्यार्थी, नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने परिसरात ऑनलाईन सेवा-सुविधा केंद्राचे काम खोळंबत आहे.

खरीप हंगामाकरिता शेतकरी पीक कर्ज मागणीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ऑनलाईन सेवा केंद्रावर गर्दी होत आहे. आताच दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल लागल्याने पुढील प्रवेशासाठी झेरॉक्स काढणे, त्याचबरोबर ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी गर्दी होत आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या वादळी पावसाने ग्रामीण भागात शेकडो शेतकऱ्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे. पंचनामा, तलाठी कार्यालयात लागणाऱ्या कागदपत्रांची झेरॉक्स काढण्याकामी नागरिकांना अडचण होत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्या घरातही उकाड्याने मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्याने पिण्याचे पाणीसुद्धा नागरिकांना मिळत नाही.

विजेचा त्रास संपावा, यासाठी महावितरणने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत. अजून पावसाला सुरुवात झाली नाही. त्यातच विजेची अडचण निर्माण होत आहे, याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्राहक करत आहेत.

सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने विद्यार्थी, तसेच शेतकरी यांना अनेक कागदपत्रांच्या झेरॉक्स काढताना हाल होत आहेत. त्यासाठी महावितरणने विजेच्या समस्येकडे लक्ष देऊन ती सोडवावी.
- राजकुमार गिरी, वीज ग्राहक

सध्या अनेक वेळा ३३ केव्ही क्षमतेची वाहिनी बंद असते. विजेची मागणी वाढल्याने अनेक वेळा पुरवठ्यात कपात केली जाते. त्यामुळे वीजपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होतो. विजेचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी महावितरणकडून प्रयत्न सुरू आहेत.
- गणेश दंडगव्हाळ, उपअभियंता, डहाणू महावितरण विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT