मुंबई

ठाणे-कसारा फलाट पाचवरून मार्गस्थ

CD

ठाणे शहर, ता.२ (बातमीदार)ः ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचे काम वेळेआधीच पूर्ण करण्याची किमया रेल्वे अभियंत्यांनी करून दाखवली. कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर ६० तासांपासून थांबलेली रेल्वेची धडधड पुन्हा सुरू झाली असून जम्बो ब्लॉक संपण्याच्या चार तास आधीच फलाट क्रमांक पाचवरून ठाणे-कसारा लोकल गाडी धावल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणाच्या कामाला गुरुवारी रात्री १२:३० वाजल्यापासून सुरुवात झाली होती. या फलाटावर प्रवाशांना उभे राहण्यासाठी पुरेशी जागा नसल्यामुळे रेल्वेने फलाटाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले होते. रविवारी दुपारी एक वाजता काम संपले. साधारणः ६० तासांपासून बंद असलेला मार्ग सुरू करण्यासाठी ५०० हून अधिक कर्मचारी, अधिकारी कामाला लागले होते. एकीकडे रेल्वे प्रशासनाबाबत निर्माण झालेला रोष नियंत्रित ठेवायचा आणि दुसरीकडे फलाटाच्या रुंदीकरणाचे कठीण काम वेळेआधीच पूर्ण करण्यात मध्य रेल्वे प्रशासन यशस्वी झाले आहे. ठाणे-कसारा ही पहिली लोकल गाडी रविवारी दुपारी या रुळावरून सोडण्यात आली. त्यानंतर ठाण्यात थांबा असलेली सायंकाळी ५:१० ची नंदीग्राम एक्स्प्रेस ही लांब पल्ल्याची पहिली गाडी प्रवाशांना घेऊन पुढे मार्गस्थ झाल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाचे कौतुक होत आहे.
-------------------------------------
हवामान विभागाने दिलेल्या पावसाच्या इशाऱ्याने फलाटाच्या रुंदीकरणाचे काम वेळेत पूर्ण होईल की नाही, अशी भीती होती, पण सगळी कामे निर्विघ्न झाली. रेल्वेने दिलेल्या वेळेच्या आधीच फलाट क्रमांक पाचवरून वाहतूक सुरू झाली. याबाबत सर्व अभियंते, कामगार, प्रवाशांचे आभार.
- केशव तावडे, स्टेशन व्यवस्थापक, ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT