मुंबई

कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपतर्फे निरंजन डावखरे

CD

कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपतर्फे निरंजन डावखरे

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपतर्फे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयातून राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांच्याकडून प्रसिद्धीपत्रकान्वये त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
२०१८ मध्ये झालेल्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले निरंजन डावखरे दुसऱ्‍यांदा निवडून आले होते. देशात व राज्यात महायुतीमध्ये शिवसेना गट सहभागी आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत महायुतीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांनी अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांचा पत्ता कट होतो की काय, अशी शंका उपस्थित होत होती; मात्र भाजपने कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. आमदार निरंजन डावखरे यांच्याकडून २०१२ पासून कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले जात आहे. ते यंदा सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून बेरोजगार पदवीधरांना नोकरीबरोबरच कोकणातील सामान्य नागरिकांसाठी आरोग्य, रस्ते आदींसह पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आमदार डावखरे यांनी प्रयत्न केले आहेत, तसेच कोकणात शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. भाजपचे कोकणातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवेन, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
...
शिंदे गटाचे संजय मोरेही मैदानात
कोकण पदवीधर मतदरासंघासाठी शिवसेना शिंदे गटाचे संजय मोरे हेसुद्धा मैदानात उतरले आहेत. उद्या ऐन लोकसभेच्या निकालाची धामधूम सुरू असतानाच ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे केंद्रात व राज्यात महायुतीची सत्ता असताना कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये मात्र महायुतीचे प्रमुख घटक असलेल्या दोन पक्षांचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
कोकण पदवीधर मतदारसंघासाठी २०१८ साली झालेल्या निवडणुकीत संजय मोरे हे एकसंध असलेल्या शिवसेनेचे उमेदवार होते. त्यावेळीही राज्यात युती असताना भाजप व शिवसेनेचे उमेदवार एकमेकांविरोधात निवडणूक लढले होते. यंदा महायुती म्हणून एकच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची रणनीती होती; मात्र कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्यासाठी संजय मोरे इच्छुक असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तसा हट्ट धरला. त्यांच्या नावावर शिवसेना शिंदे गटाने अजून अधिकृत शिक्कामोर्तब केले नसले तरी ते मुख्यमंत्र्यांचे खास विश्वासू असल्याने त्यांना पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती असूनही भाजप, शिवसेना शिंदे गट आमनेसामने येणार असून २०१८ ची पुनरावृत्ती २०२४ च्या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT