मुंबई

आठवड्याची सुरुवात लेटमार्कने

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.३ : सलग दोन दिवसांच्या मेगाब्लॉकनंतर लोकल सेवा पूर्ववत झाली असेल या आशेने घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांचा सोमवारी भ्रमनिरास झाला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणीमुळे मुंबईकडे जाणाऱ्या लोकल सेवा ३० ते ४५ मिनिटे विलंबाने धावत होत्या, तर पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकात सकाळी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील सेवा खोळंबल्याने नोकरदारांना लेटमार्क बसला.
सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १०-११च्या विस्तारीकरणासाठी आणि ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणासाठी रेल्वेने गुरुवारी मध्यरात्रीपासून घेतलेले दोन्ही मेगाब्लॉक नियोजित वेळेपूर्वीच रविवारी दुपारी संपले. त्यानंतर सीएसएमटी ते वडाळा रोड आणि भायखळा दरम्यानची लोकल वाहतूक सुरळीत सुरू झाली. दोन दिवस प्रवासात आलेल्या अडचणीनंतर मुंबईकरांना सुटकेचा निःश्वास सोडला. त्याप्रमाणे सोमवारी वेळेत कार्यालयात पोहोचू, या आशेने मुंबईकर पहाटेपासून रेल्वे स्थानकात गर्दी करू लागले, परंतु मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील वाहतूक पूर्णतः कोलमडल्याने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांच्या अपेक्षेवर पाणी फेरले.
---------------------------------
नवीन यंत्रणेमुळे काही दिवस त्रास
सीएसएमटी स्थानकात ब्लॉक दरम्यान नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा बसवण्यात आली. ही संगणकावर आधारित नवीन यंत्रणा असल्याने सिग्नल यंत्रणा स्थिर होण्यासाठी आणि यंत्रणेत असलेल्या काही दोष आणि अडचणी दुरुस्त करण्यासाठी वेळ लागत आहे. लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या संचालनादरम्यान हा दोष दिसून आला, तसेच इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग ही यंत्रणा नवीन असल्याने सेट होण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याने मुंबईकरांना आणखी काही दिवस लेटमार्कचा त्रास सहन करावा लागणार आहे.
--------------------------
प्रवाशांचे प्रचंड हाल
- सोमवारी पहाटेपासूनच सीएसएमटी ते भायखळा दरम्यान जलद मार्गावरील लोकल सेवांचे आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले होते. त्यामुळे अप जलद मार्गावरील लोकल भायखळा स्थानकातून धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. त्यामुळे धीम्या मार्गावरील लोकल ३० ते ३५ मिनिटे उशिराने धावत असल्यामुळे दादर ते सीएसएमटी दरम्यान एकामागोमाग गाड्या उभ्या राहिल्याने प्रवाशांचे हाल झाले.
- सीएसएमटीच्या नवीन यंत्रणेतील दोषांमुळे लोकल सेवांचे बंचिंग झाले. अनेक प्रवासी लोकलमध्ये अडकल्याने काहींनी रुळावर उतरून पायी चालत जाण्याचा मार्ग स्वीकारला, तर लोकल विलंबाने कल्याण, ठाणे, कुर्ला आणि दादर स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून आली. संध्याकाळी देखील हीच परिस्थिती असल्याने प्रवाशांना दिवसभर गर्दीचा सामना करावा लागला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT