मुंबई

अपेक्षित यश नसल्याने भाजप कार्यकर्ते उदास

CD

बोर्डी, ता. ४ (बातमीदार) : पालघर लोकसभा मतदारसंघातील महायुतीपुरस्कृत उमेदवार हेमंत सवरा यांच्या विजयाचे बोर्डी परिसरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले. असे असले तरी केंद्रामध्ये मात्र अपेक्षित यश नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये उदासीनता दिसून आली. सवरा यांच्या विजयानिमित्ताने विजय मिरवणूक काढणार काय? असा प्रश्न केला असता एका कार्यकर्त्याने केंद्रात अपेक्षित यश मिळाले असते, तर समाधानाची बाब असती. परंतु निराशाजनक निकाल आल्यामुळे आमचा उत्साह मावळला आहे, असे सकाळशी बोलताना सांगितले. तरीही सर्व कार्यकर्त्यांना आणि तालुका पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांना विचारून संध्याकाळी विजय मिरवणूक काढण्याचा निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, घोलवड ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि भारतीय जनता पक्ष युवा मंचचे तालुकाध्यक्ष कुणाल शहा यांनी विजयाचे स्वागत केले आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी आणि बविआचे राजेश पाटील यांच्या पराभवामुळे कार्यकर्त्यांमध्येही उदासीनता दिसून आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT