मुंबई

टपाली मतदानात २० टक्के नोटाला पसंती

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणुकीत विभागाकडून जनजागृती करण्यात आली. तर, निवडणुकीच्या कर्तव्यावर असणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी टपाली मतदानाची व्यवस्था केली होती. त्यानुसार भिवंडी लोकसभेत चार हजार ६१ टपाली मतदान झाले. त्यापैकी ८१ शासकीय कर्मचाऱ्यांनी नोटाला पसंती देत उमेदवारांना नाकारल्याचे दिसून आले.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून विविध जनजागृतीपर कार्यक्रम हाती घेतले होते. तर, दुसरीकडे या लोकशाहीच्या उत्सवाच्या कामासाठी तैनात असणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार शासकीय मतदारांनीदेखील या सुविधेला प्रतिसाद देत टपाली मतदान केले. भिवंडी लोकसभा मतदारसंघात चार हजार ३९२ टपाली मतदार आहेत. त्यापैकी चार हजार ६१ मतदारांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला. तर, ३३१ मते बाद झाली आहेत. तसेच मतदानाच्या २० टक्के म्हणजेच ८१ शासकीय मतदारांनी नोटाला पसंती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT