मुंबई

मराठी टक्क्याने ‘आघाडी’ला बळ

CD

मराठी टक्क्याने ‘आघाडी’ला बळ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मुंबईत लोकसभा निवडणुकीत सर्वच मतदारसंघातील मराठी टक्का कमी अधिक प्रमाणात असून या निवडणुकीत मराठी भाषिकांनी महाविकास आघाडीला बळ दिल्याचे निकालावरून दिसून येते. मुंबईतील सहापैकी चार जागा आघाडीला मिळाल्या, या यशात मराठी मतदारांची भूमिका निर्णायक ठरली.

मराठी टक्का अजूनही मुंबईत टिकून असल्याचे या निवडणुकीत दिसले. महायुतीने मराठी व्होट बॅक आपल्याकडे वळविण्यासाठी जोरदार प्रयत्न केला होता. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही जोरदार प्रयत्न सुरू केले होते. मराठी भाषिकांच्या मतविभागणीसाठी महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीच्या शेवटपर्यंत प्रयत्न केले, मात्र त्याला यश आले नाही. निकालावरून मराठी मतदारांनी आघाडीच्या पारड्यात भरघोस मतदान केल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. ईशान्य मुंबई हा मतदारसंघात मराठी मतदारांची संख्या इतर मतदारांच्या तुलनेत मोठी आहे. याठिकाणी विक्रोळी, भांडुप, घाटकोपर या विधानसभा मतदारसंघातून आघाडीचे संजय पाटील यांना भरघोस मतदान झाल्याचे निकालावरून दिसून येते. उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात रवींद्र वायकर यांना गोरेगाव, दिंडोशी, जोगेश्वरी या भागातील मराठी पट्ट्यात मोठे मतदान झाले. उत्तर मुंबईत भाजपचे पियूष गोयल यांना मागाठाणे, बोरिवली गोराई, चारकोप या मराठीपट्ट्यात मोठा जनाधार मिळाला. येथील मोठ्या म्हाडाच्या वसाहती आहेत. तेथील मतदारांनी कॉंग्रेसचे भूषण पाटील यांनाही मतदान केले आहे. याठिकाणी मराठी मते विभागली गेल्याचे दिसून येत आहेत. दक्षिण मुंबई अरविंद सावंत यांना वरळी, शिवडी, भायखळा, गिरगाव या भागात मराठी मतदारांची साथ मिळाली. त्यामुळे त्यांचा विजय सोपा झाला. दक्षिण मध्य मुंबईत माहीम आणि वडाळा येथून आघाडी मिळाली. सायन कोळीवाडा, धारावी, चेंबूर आणि अणुशक्तीनगर येथून मराठी मतदारांची मते शिवसेनेचे अनिल देसाई यांना मिळाली. या निवडणुकीत मराठी मते निर्णायक ठरल्याने आघाडीला फायदा झाला आहे.

‘मविआ’ला फायदा
‘मनसे’ला सोबत घेतल्याने शिवसेना ठाकरे गटाला मिळणाऱ्या मराठी मतांचे विभाजन करता येईल, असे भाजपच्या नेत्यांना वाटले. मात्र, मनसेचा मोठा परिणाम ठाकरे गटाच्या उमेदवारांवर झाला नाही. शिंदे गटाचा प्रभाव मुंबईत कुठेच दिसला नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पाटील, वर्षा गायकवाड, अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांना मराठी मते एकगठ्ठा मिळाली, त्यामुळे त्यांचा विजय सोपा झाला.
--------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT