मुंबई

दरडग्रस्त भागात संरक्षक भिंतीच्या कामांना वेग

CD

दरडग्रस्त भागात संरक्षक भिंतीच्या कामांना वेग


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : पावसाळ्यात दरडींचा धोका असणाऱ्या पूर्व उपगरातील काही भागात संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू असून सूर्यानगर भागात काही ठिकाणी म्हाडाद्वारे संरक्षक भिंत बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे, तसेच काही भागात संरक्षक भिंत बांधण्यासाठी म्हाडाद्वारे निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सूर्यानगर विक्रोळी (पश्चिम) येथील भाग हा डोंगर उतारावर आहे. पालिकेच्या भांडूप एस विभागातील जास्तीत जास्त भाग हा डोंगर उताराचा आहे. या डोंगराळ भागात दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे म्हाडा प्राधिकरणाद्वारे याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू असल्याची माहिती पालिकेने दिली. भांडूप एस विभागार्फत अशा धोकादायक दरडप्रवण क्षेत्रातील घरांना नोटीस देऊन ही घरे रिक्त करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे, तसेच या परिसरात सावधानता फलक लावतानाच नागरिकांना सावधानतेचा इशाराही देण्यात आला आहे. पालिकेने दरड कोसळून जीवित आणि वित्तहानी होऊ नये यासाठी दरडीलगत राहणाऱ्या नागरिकांचे सर्वेक्षण केले असून त्यांच्या सुरक्षितस्थळी स्थलांतराच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती ओढविल्यास किंवा कोणतीही दुर्घटना घडल्यास संबंधित रहिवासी जबाबदार असतील, असे या पालिकेने पाठवलेल्या नोटिसीत म्हटले आहे.

..
१३ ठिकाणे धोकादायक
पावसाळ्यात भांडुप, विक्रोळी घाटकोपर येथील १३ ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका असल्याचे पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांनाही नोटीस बजावली आहे. त्यातच दरडींचा धोका असलेल्या नागरिकांचे पालिका आणि म्हाडाच्या पीएपीमध्ये तात्पुरते स्थलांतर करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पालिकेच्या विभाग स्तरावर आता पीएपी शोध सुरू असून एमएमआरडीच्या प्रशासनानेही आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT