मुंबई

अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक

CD

अमली पदार्थाच्या विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक
मेफेड्रोन जप्त, सहा लाख ५० हजारांचा ऐवज जप्त
पनवेल (वार्ताहर) : तळोजा फेज एकमधील पेठाली गाव येथे एमडी हे अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला अमली पदार्थविरोधी पथकाने शुक्रवारी (ता. ७) रात्री सापळा रचून अटक केली. मोबिन मेहबूब खान ( वय २८) असे या तरुणाचे नाव असून त्याच्याजवळ असलेल्या ६५ ग्रॅम वजनाचे सहा लाख ५० हजार रुपये किमतीचे एमडी हे अमली पदार्थ जप्त केले.
अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी एक व्यक्ती येणार असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीरज चौधरी व त्यांच्या पथकाने शुक्रवारी सापळा लावला होता. त्यानंतर रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास संबंधित व्यक्ती मोबिन मेहबूब खान हा संशयास्पदरीत्या तिथे फिरत असल्याचे दिसून आले. त्यानंतर पथकाने त्याची धरपकड केली. त्याला पकडून त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पांढऱ्या रंगाच्या पावडरसारखा एमडी (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ त्याच्याकडे आढळून आला. याप्रकरणी त्याच्याविरोधात तळोजा पोलिसात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT