मुंबई

स्कूल बसभाडेवाढीचा इशारा

CD

स्कूल बस भाडेवाढीचा इशारा
सरकारच्या निर्णयाविरोधात संघटना आक्रमक

सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. १० :  प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळा सकाळी नऊनंतर भरवण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध झाल्याने हा निर्णय मागे घेतला जाईल, असे शिक्षण मंत्र्यांनी सांगितले होते. त्यातच शिक्षण विभागाने चर्चा न करता निर्णयाची अंमलबजावणी केल्याने स्कूल बसमालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या  निर्णयावर फेरविचार न केल्यास स्कूल बसचे भाडे २५ ते ४० टक्क्यांनी वाढवण्याचा इशारा शालेय बसमालकांनी राज्य सरकारला दिला आहे. 
पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंत शाळा सकाळी नऊनंतर भरवण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे; मात्र या निर्णयाला स्कूल बसमालक संघटनांनी विरोध दर्शवला आहे. शाळा व्यवस्थापन आणि स्कूल बसमालकांशी कोणत्याही प्रकारे चर्चा न करता हा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आल्याचे शालेय बसमालकांचे  म्हणणे आहे. सकाळी नऊला मुंबईत गर्दीच्या वेळी म्हणजेच पीकअवरमध्ये स्कूल बसला वाहतूक कोंडीत अडकावे लागणार आहे. यामध्ये मुंबईतील वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या स्थितीकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. शिवाय प्राथमिक शाळा सकाळी नऊनंतर भरवल्यास दोन शिफ्टचे व्यवस्थापन शालेय बसमालकांना शक्य होणार नाही. यामुळे शालेय बस एकूण आठ फेऱ्या गर्दीच्या वेळी माराव्या लागणार आहेत. त्यामुळे हा निर्णय बदलला गेला नाही, बसमालकांना या निर्णयाबाबत सक्ती केली तर स्कूल बसमालक संघटना स्कूल बस भाडे २५ ते ४० टक्के वाढविण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे किंवा काही शाळांसाठी प्राथमिक शाळेसाठी स्कूल बस सेवा देणे कठीण असल्याचे संघटनांकडून सांगण्यात आले.
..
प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळा सकाळी नऊनंतर भरवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्याला विरोध झाल्यानंतर हा निर्णय मागे घेतला जाईल, असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले होते.  मिरा-भाईंदर शिक्षण अधिकाऱ्यांनी प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळा सकाळी नऊनंतर भरवण्याचा  निर्णय जारी केला आहे. गर्दीत विद्यार्थ्यांना ने-आण करणे हे अधिक अडचणीचे होणार असून यामध्ये अधिकचा वेळ लागणार आहे.
- अनिल गर्ग, अध्यक्ष, स्कूल बस ओनर्स असोसिएशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT