मुंबई

इहोर्डींग हटवण्याचे काम सुरूच

CD

होर्डिंग हटवण्याचे काम सुरूच
पेट्रोल पंपाला पत्र्याची संरक्षण भिंत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ ः घाटकोपर दुर्घटनेतील होर्डिंग हटवण्याचे काम अद्याप सुरूच आहे. होर्डिंगचे लोखंडी अँगल कापून हटवण्याचे काम सुरू आहे. दुर्घटनाग्रस्त लोखंडी अँगल इतका मोठा आहे की, एका महिन्यानंतरदेखील कटिंगचे काम सुरू आहे.
मुंबईत साधारणतः ४० बाय ४० म्हणजेच १६०० चौरस फूट मोठे होर्डिंग उभारण्यास परवानगी दिली जाते; मात्र घाटकोपरचे दुर्घटनाग्रस्त होर्डिंग हे नियमांना धाब्यावर बसवून १२० बाय १२० म्हणजेच १४,४०० फूट उभारण्यात आले होते. यासाठी महाकाय असा लोखंडी अँगल तयार करण्यात आला होता. होर्डिंगसह हा अँगल कोसळून ही दुर्घटना घडली.
एका महिन्यानंतरदेखील लोखंडी अँगल कटिंगचे काम सुरू आहे. दररोज सुमारे ८ ते १० कामगार इलेक्ट्रिक कटरच्या साह्याने लोखंड कापण्याचे काम करतात. कापलेले लोखंडाचे तुकडे बाजूलाच रचले जात आहेत; तर पेट्रोल पंपाचा सांगाडा पेट्रोल पंपाच्या दुसऱ्या कोपऱ्यात रचून ठेवण्यात आला आहे. पेट्रोल पंपाचा परिसर पत्र्याच्या संरक्षण भिंतीने बंद करण्यात आला आहे.
ही दुर्घटना इतकी भयानक होती की, मुंबईकर एक महिन्यानंतरही विसरू शकलेले नाहीत. आजही अनेक लोक इथून जाताना काही वेळ थांबून त्या घटनेला आठवतात; तर पीडितांचे काही नातेवाईकदेखील इन्शुरन्सच्या कामासाठी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत येतात. काही पीडित आपल्या नातेवाईकांना घेऊन हे स्थळ दाखवतात; तर काही जण धार्मिक विधीसाठी येथे येऊन गेल्याचे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले टॅक्सीचालक सतीश सिंग यांचा मुलगा शिवम सिंग याने सांगितले.
मृत्युमुखी पडलेले रिक्षाचालक अक्रम रवारिया याचा भाऊ अस्लम रवारिया म्‍हणाला, दुर्घटना आठवली की अजूनही अंगावर शहारे येतात. येथून प्रवास करताना दुर्घटना डोळ्यासमोर येते. त्या वेळी मनात भीती दाटून येते. सरकारी तुटपुंजी मदत मिळाली; पण या घटनेला कारणीभूत असणाऱ्या दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT