Sakal Premier Awards 2024 Sakal
मुंबई

Sakal Premier Awards 2024 : ठाण्यात अवतरणार अवघे तारका मंडळ

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News : बऱ्याच दिवसांपासून कलाकारांबरोबरच रसिक प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो सकाळ प्रीमियर पुरस्कार सोहळा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. मनोरंजनसृष्टीतील तारे-तारकांची उपस्थिती, डोळ्यांचे पारणे फेडणारे नृत्य, विनोदाचा अनलिमिटेड डोस अन् अप्रतिम सूत्रसंचालन अशी मनोरंजनाची लज्जतदार मेजवानी अनुभवण्यासाठी रसिकही आतुर झाले आहेत.

बुधवारी (ता. १२) ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात सायंकाळी ६ वाजता हा सोहळा रंगणार आहे. सिनेसृष्टीतील अवघे तारका मंडळ त्यासाठी ठाण्यात अवतरणार आहे.
राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन अशा विविध क्षेत्रांतील नामवंत मंडळी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

पीएनजी ज्वेलर्स लि. सोहळ्याचे मुख्य प्रायोजक आहेत. मुंबईत पहिला प्रीमियर अवॉर्ड सोहळा दिमाखात पार पडल्यानंतर दुसरा सोहळा पुण्यात झाला. त्यानंतर गेल्या वर्षी ठाण्यात झालेला तिसरा सोहळा चित्रपटसृष्टीतील दिग्गजांसह ठाणेकरांनी ‘हाऊसफुल’ केला. याच ठाण्यात आता चौथ्या सोहळ्याची उत्सुकता शिगेला पोचली आहे. सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी, अस्मिता देशमुख, शिव ठाकरे, संचित चौधरी इत्यादी कलाकार दमदार नृत्याविष्कारांनी सोहळ्याची रंगत वाढवणार आहेत. सुरांची बरसात करण्यासाठी गायक अभिजित सावंत आवर्जून उपस्थित राहणार आहे.

सोहळ्याचे नवे आकर्षण असेल, ते म्हणजे नव्या पिढीचा कलाकार रॅपर सौरभ अभ्यंकर अर्थात ‘१००आरबीएच.’ आपल्या मराठमोळ्या रॅपच्या माध्यमातून रसिकांशी ‘संवाद’ साधण्याची त्याची अनोखी कला यानिमित्त रसिकांना अनुभवता येणार आहे. अभिनेते पुष्कर श्रोत्री आणि ‘भाडिपा’फेम सारंग साठे सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार आहेत. सारंग प्रथमच एका मोठ्या सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार असल्याने त्याचीही उत्सुकता लागून राहिली आहे.

यंदाच्या सोहळ्यात एकापेक्षा एक सरस विविध चित्रपटांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. आलेल्या कलाकारांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी रेड कार्पेटवर अभिनेत्री साक्षी गांधी उपस्थित असेल. सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेत्री, अभिनेता, कथा, पटकथा, गीतकार, संकलक इत्यादी पुरस्कारांबरोबरच काही मान्यवरांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.

या कलाकारांत स्पर्धा

सुभेदार, आत्मपॅम्फ्लेट, नाळ २, महाराष्ट्र शाहीर, बापल्योक, बटरफ्लाय, झिम्मा २ आणि श्यामची आई अशा २०२३ मधील दर्जेदार चित्रपटांमध्ये प्रीमियर पुरस्कारासाठी मोठी चुरस आहे. अंकुश चौधरी, अजय पूरकर आणि शशांक शेंडे यांच्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी स्पर्धा होणार आहे. मधुरा वेलणकर, निर्मिती सावंत आणि शिल्पा नवलकर यांची नावे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीच्या पुरस्कारांच्या स्पर्धेत आहेत. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी आशीष बेंडे, केदार शिंदे आणि सुधाकर यक्कंटी यांची नावे आघाडीवर आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT